प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या योजनेचा २४ वा हप्ता येत्या ३० ऑक्टोबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या हप्त्याद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची रक्कम दिली जाईल.
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात. अशा प्रकारे वर्षाला एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात वर्ग केली जाते. दरम्यान, शासनाने स्पष्ट केले आहे की आगामी २४ व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (PM Kisan e-KYC) पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे.
जर बँक खात्याची माहिती चुकीची असेल किंवा ई-केवायसी अपूर्ण असेल, तर हप्त्याचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे ज्यांची ही प्रक्रिया बाकी आहे, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी.
शेतकरी आपल्या हप्त्याची आणि अर्जाची सद्यस्थिती घरबसल्या ऑनलाइन तपासू शकतात. यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर विचारलेली माहिती आणि नोंदणी क्रमांक (Registration Number) टाकून स्थिती पाहता येते. क्रमांक माहीत नसल्यास वेबसाइटवरील उपलब्ध पर्यायाद्वारे तो शोधता येतो.
योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी मोबाईलवरूनही ई-केवायसी करता येते. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘PM-Kisan’ आणि ‘AadhaarFaceRD’ हे दोन अॅप डाउनलोड करावे लागतील. नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन केल्यावर लाभार्थी स्टेटस पेजवर ई-केवायसीची स्थिती तपासता येते.
जर ई-केवायसीच्या समोर ‘No’ असा पर्याय दिसत असेल, तर त्यावर क्लिक करून आधार क्रमांक टाकावा आणि फेस स्कॅनची प्रक्रिया पूर्ण करावी. मोबाईलद्वारे प्रक्रिया करण्यात काही अडचण येत असल्यास, शेतकरी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर (CSC) जाऊनही मदत घेऊ शकतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये पोहोचवले? ऑडिओ क्लिपच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
- लाडकी बहीण योजनेनंतर आता एकल महिलांसाठी नवीन योजना; १२ लाख जणींना मिळणार आर्थिक आधार
- मुंढवा जमीन घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेकडून पार्थ पवार यांना नोटीस
Quick Answers
पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता येत्या ३० ऑक्टोबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार असून, याद्वारे दोन हजार रुपयांची रक्कम दिली जाईल.
आगामी २४ व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (PM Kisan e-KYC) पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी अपूर्ण असल्यास किंवा बँक खात्याची माहिती चुकीची असल्यास पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते.
शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करून, विचारलेली माहिती आणि नोंदणी क्रमांक टाकून स्थिती तपासू शकतात.
मोबाईलवरून ई-केवायसी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून 'PM-Kisan' आणि 'AadhaarFaceRD' हे दोन अॅप डाउनलोड करावे लागतील.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








