प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: राज्यभरातील लाखो पात्र महिलांना ‘लाडकी बहीण योजने’ (Ladki Bahin Yojana) अंतर्गत दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतल्यास २५ नोव्हेंबरपर्यंत महिलांना ऑक्टोबर महिन्याचे पैसे दिले जाऊ शकतात.
दरम्यान, ही २५ नोव्हेंबरची तारीख सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी आणि भाऊबीजेसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर, महिलांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन महिन्यांचे ३००० रुपये एकत्र मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र, सरकारने दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात केवळ सप्टेंबर महिन्याचेच १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यावर पाठवले. दोन महिन्यांचे पैसे एकत्र न मिळाल्यामुळे आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. जर नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरचे पैसे आले नाहीत, तर सरकार डिसेंबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्र देणार का, अशी विचारणा होत आहे.
या संभाव्य ३००० रुपयांच्या एकत्र हप्त्याबाबत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात नेमके पैसे कधी आणि किती जमा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयपीएल घोषणेपूर्वीच अर्शदीप सिंगच्या मुंबई इंडियन्स प्रवेशावर वडिलांचे शिक्कामोर्तब
- २०२८ पासून आयपीएलमध्ये १२ संघांचा समावेशाची शक्यता, पुणे आणि वडोदरा फ्रँचायझी शर्यतीत आघाडीवर
- झिम्बाब्वेचा कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम, दोन्ही डावांत ५०० हून अधिक धावा करणारा पहिला संघ
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








