लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार; खासदार ज्योती वाघमारेंचा मोठा दावा

लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील, असा दावा करत शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत आणि रोहित पवारांवरही निशाणा साधला.

Published On: 

eknath Shinde Gat Mumbai Mayor strategy

सोलापूर, 9 नोव्हेंबर: राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा मोठा दावा शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी केला आहे. साहेब राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आपण पंढरीच्या विठुरायाला साकडं घातल्याचे त्यांनी सांगितले. बहिणीने भावासाठी देवाकडे मागितलेल्या साकड्यात मोठी ताकद असते, त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नक्कीच मुख्यमंत्री होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर टीका करताना वाघमारे म्हणाल्या की, विरोधकांनी आधी शेतकऱ्यांना पाच रुपयांचा बिस्किटाचा पुडा तरी द्यावा आणि मगच सरकारला शिकवावे. सध्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली पाच रुपयांची मदत ही केवळ तात्पुरती असून, आगामी काळात सरकार नक्कीच भरघोस मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेना हा संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांना मदत करणारा एकमेव पक्ष असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. जोपर्यंत शेतकरी आणि लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होत नाही, तोपर्यंत आपलीही दिवाळी गोड होणार नाही, अशी भूमिका खुद्द शिंदेंनी घेतली आहे. अतिवृष्टी असो वा यंदाचा कोरडा दुष्काळ, संकट अस्मानी असो वा सुलतानी, एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात सदैव पाठीशी आहे, हाच संदेश देण्यासाठी आपण आल्याचे त्यांनी नमूद केले.

उजनी धरणावर होऊ घातलेल्या ‘एआय’ (AI) डेटा सेंटरच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. उजनी धरण ही सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असून शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. विकास आणि प्रकल्प नक्कीच झाले पाहिजेत, मात्र त्यासाठी आधी शेतकऱ्यांशी समन्वय साधला गेला पाहिजे. या पार्श्वभूमीवर दिवाळी संपल्यानंतर आपण स्वतः शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार असल्याची माहिती खासदार वाघमारे यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही