कोल्हापूर, 9 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थिती आणि कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) यांनी जोरदार शब्दांत प्रहार केला आहे. आयटी सेलकडून आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र, या धमक्यांना न जुमानता आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील लोकशाहीच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना पाटील यांनी राजकीय स्वार्थासाठी चाललेल्या ‘कोरम’च्या राजकारणावर सडकून टीका केली. “मला धमक्या येतात, आयटी सेलवाले माझ्या नावामागे पेटलेत,” असे सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यासोबतच, “राजकीय नेत्यांनी राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी सामान्य लोकांकडून चालवलेली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर थेट हल्लाबोल केला. भाजपचे कमळ चिन्ह फुलावे यासाठी राज्याच्या राजकारणाचा चिखल केला जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. स्थानिक गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगानेही त्यांनी काही नेत्यांना लक्ष्य केले. हे नेते स्थानिक गोकुळकडे दुर्लक्ष करून अमूलच्या उत्पादनांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने एकत्र यावे, असे आवाहन विवेकानंद पाटील यांनी शेवटी केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’: नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक
- अजित पवारांच्या अपघातात तटकरेंचा हात? रामदास कदमांनी केली थेट चौकशीची मागणी
- ‘गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो’; कोल्हापूरच्या मोर्चात विवेकानंद पाटलांची सरकारवर घणाघाती टीका
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







