कोल्हापूर, 9 नोव्हेंबर: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या हालचालींवरून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या निर्णयाविरोधात विवेकानंद पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे. नामनिर्देशित सदस्यांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर थेट अन्याय होत असल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या आंदोलनात उतरल्याचे सांगत पाटील यांनी बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा आवर्जून उल्लेख केला. जर त्यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले असेल, तर दूध संघाचा अध्यक्षदेखील त्यांच्याच बहुमतातील असायला हवा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे म्हणजे मागच्या दाराने आत घुसण्यासारखे आहे, अशी सडकून टीका पाटील यांनी केली. निवडून आलेला प्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने ‘चेअरमन’ असतो, मात्र नामनिर्देशित सदस्यांच्या माध्यमातून नेमला जाणारा अध्यक्ष हा ‘चोरमन’ असतो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. आम्हाला आमच्या हक्काचा चेअरमन हवा असून, चोरमन नको अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांनी कष्ट करून मिळवलेल्या दुधावर लोणी काढण्याचा हा कुटील डाव असल्याचा घणाघातही त्यांनी केला. तसेच, राज्यातील एका नाकारलेल्या मंत्र्याचा या सगळ्या प्रकारामागे हात असल्याचा गंभीर आरोप विवेकानंद पाटील यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहण्याचा दिला इशारा
- ‘मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही भाजप नेत्यांची दंतकथाच’; राज ठाकरेंची फटकेबाजी
- गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








