प्रतिनिधी, 9 नोव्हेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मिश्किल भाष्य केले आहे. ‘भाजपचे नेते सांगायचे की मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) माझं ऐकतात, पण ही केवळ एक दंतकथाच होती. आता मुख्यमंत्र्यांशी बोलून पाहतो, ते ऐकतात का ते पाहू,’ असा टोला त्यांनी लगावला. पुण्यातील दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी इतिहासातील दंतकथांचा संदर्भ देत राजकीय फटकेबाजी केली.
रायगडावर फिरू दिले जात नाही अशी तक्रार असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले की, कुणी पकडून टकमक टोकावरून खाली घेऊन गेले तर, या भीतीने कदाचित तिथे मुक्कामाला बंदी घातली असावी. यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आवर्जून आठवण काढली. आज ते असायला हवे होते, त्यांनी इतिहास सांगावा आणि आपण तो ऐकावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांकडूनच इतिहासाकडे कसे पाहावे हे समजल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.
इतिहासावर कधीही कुणी हक्क सांगू नये, कारण उद्या कोणती नवी कागदपत्रे सापडतील हे सांगता येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. गडकिल्ल्यांवरील गाईड्सवरही त्यांनी भाष्य केले. परदेशात गाईड कोण असावे हे तिथले सरकार ठरवते, मात्र आपल्याकडे कुणीही उठतो आणि गाईड बनतो, असे सांगत मुळात त्यांनाच अभ्यासाची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. अशा प्रकारांतूनच दंतकथा तयार होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दंतकथा रंजक असल्याने त्या खूप प्रचलित होतात, मात्र त्यामुळे कधीकधी मूळ इतिहास बाजूला पडतो. इतिहासाच्या खूप खोलातही जाऊ नये, असे ते म्हणाले. आपल्याकडे पुतळ्यांवर पुतळे उभारले जातात, पण केवळ पुतळे उभारून चालणार नाही, असे सांगत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या परदेशातील उदाहरणाचा दाखला दिला. परदेशात पुतळे नसतात कारण इतिहास त्यांच्या रक्तात रुजलेला असतो, आपल्याकडे मात्र अजून महाराज रक्तात भिनले नाहीत, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
- व्हिक्टोरियन क्रिकेटमधील बॉल टॅम्परिंगबाबत स्कॉट बोलंडने उस्मान ख्वाजाचे दावे फेटाळले
- पुनरागमनानंतर काही तासांतच ऑस्ट्रेलियन गोलंदाज लान्स मॉरिसला पुन्हा दुखापत
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







