राज्याच्या प्रशासनात मोठे बदल होणार? नव्या मुख्य सचिवपदासाठी ३ नावांची जोरदार चर्चा

मुख्य सचिव राजेश अग्रवाल ३० नोव्हेंबरला निवृत्त होत असून, नव्या सचिवपदासाठी मनीषा म्हैसकर, संजय सेठी आणि मिलिंद म्हैसकर यांच्या नावाची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.

Published On: 

Maharashtra new chief secretary appointment discussion

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठ्या बदलांची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ देण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप केंद्राकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राज्याला नवे मुख्य सचिव मिळणार की आधीच्याच मुख्य सचिवांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

राजेश अग्रवाल यांना मुख्य सचिव म्हणून ११ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला आहे. राज्यात दुष्काळ असताना मुख्य सचिवांना मुदतवाढ दिल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी आहेत. याच निकषानुसार त्यांना मुदतवाढ मिळेल का याकडे लक्ष लागले आहे. मात्र, सध्याच्या दुष्काळाची दाहकता आणखी किती महिने राहील याची कोणतीही शाश्वती नाही, त्यामुळे केवळ ३ महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.

नव्या मुख्य सचिवपदासाठी १९९२ च्या बॅचच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांचा समावेश आहे. ज्येष्ठतेचा विचार करता मनीषा म्हैसकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

निवृत्तीच्या तारखांनुसार, मनीषा म्हैसकर मार्च २०२९ मध्ये निवृत्त होणार असून, त्यांना संधी मिळाल्यास मुख्य सचिव पदाचा २ वर्षे आणि ४ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. संजय सेठी पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात निवृत्त होणार असल्याने त्यांना १० महिन्यांचा, तर नोव्हेंबर २०२८ मध्ये निवृत्त होणाऱ्या मिलिंद म्हैसकर यांना १४ महिन्यांचा कार्यकाळ मिळू शकतो.

जर मिलिंद म्हैसकर यांना आधी संधी दिली, तर त्यानंतर मनीषा म्हैसकर यांना केवळ ४ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. केवळ चार महिन्यांसाठी मुख्य सचिव करणे ही प्रशासनात अन्यायाची भावना मानली जाते. त्यामुळे आता मुख्य सचिवपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही