‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेच्या प्रचंड यशानंतर, आता राज्य सरकार राज्यातील महिलांना आणखी एक मोठा सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. पतीचे निधन झालेल्या, घटस्फोटीत, परित्यक्त्या किंवा खंबीरपणे एकट्याने कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या ‘एकल महिलांसाठी’ (Ekal Mahila Yojana) आता थेट एक स्वतंत्र आर्थिक योजना आणली जात आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच एका कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी योजनेची प्राथमिक माहिती दिली. त्यांच्या या सूतोवाचामुळे आता कष्टकरी आणि संघर्ष करणाऱ्या महिलांना हक्काचा भक्कम आधार मिळणार हे निश्चित मानले जात आहे.
ई-केवायसी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना बाहेर पडावे लागले, ज्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. पण आता सरकारने यावर मात करत थेट एकल महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेक महिला कोणत्याही संकटाला न डगमगता एकट्याच आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा आणि कुटुंबाच्या उपजीविकेचा भार खांद्यावर पेलतात. त्यामुळेच, अशा महिलांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर ही नवी आणि विशेष योजना आणली जात आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील तब्बल १२ लाखांहून अधिक एकल महिलांना थेट फायदा होणार आहे.
Ekal Mahila Yojana Maharashtra
दुसरीकडे, या योजनेची घोषणा केवळ कागदावर राहू नये म्हणून राज्यभरात लाभार्थी महिलांची माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, प्राथमिक स्तरावर शिक्षण विभागाच्या माध्यमातून थेट शाळा आणि महाविद्यालयांमधूनच डेटा संकलित केला जात आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे वडील हयात नाहीत, अशा पाल्यांची स्वतंत्र नोंद घेऊन एकल मातांची माहिती गोळा केली जात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीदेखील गठीत करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास ३ लाखांहून अधिक एकल महिलांची अधिकृत नोंद शिक्षण विभागाच्या हाती लागली आहे.
शिक्षण विभागाच्या या मोहिमेनंतर, पुढील टप्प्यात तहसील आणि गावपातळीवरूनही सविस्तर माहिती जमा केली जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर, राज्यातील एकल महिलांची अचूक आकडेवारी समोर आल्यावर त्यांना योजनाबद्ध पद्धतीने थेट आर्थिक मदत पोहोचवली जाईल. अद्याप या योजनेची अधिकृत घोषणा, लाभाची रक्कम आणि पात्रतेचे निकष जाहीर झालेले नाहीत. मात्र, लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या योजनेच्या अटी आणि शर्तींची नियमावली जाहीर केली जाणार असून, राज्यातील हजारो कुटुंबे या मोठ्या निर्णयाकडे आशेने लक्ष लावून बसली आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्राजक्ता हनमघरची ट्रोलर्सना सणसणीत चपराग; ‘तू हिजडा आहेस’ म्हणणाऱ्याला दाखवली त्याची जागा
- KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी बाणा; नवऱ्यासाठी घेतलेला ‘तो’ उखाणा ऐकून कलाकारही लोटपोट!
- “मराठे स्टुडिओ फोडून सुशील कुलकर्णीला चोपतील असं वाटलं होतं”; सुषमा अंधारेंचा घणाघात
Quick Answers
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात या योजनेची प्राथमिक माहिती दिली.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे राज्यातील १२ लाखांहून अधिक एकल महिलांना थेट फायदा होणार आहे.
शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांमधून प्रवेश प्रक्रियेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे वडील हयात नाहीत अशा पाल्यांची नोंद घेऊन एकल मातांची माहिती गोळा केली जात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास ३ लाखांहून अधिक एकल महिलांची अधिकृत नोंद शिक्षण विभागाच्या हाती लागली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








