भारत-न्यूझीलंड चौथ्या टी-२० पूर्वी टिळक वर्माने उलगडलं आपल्या नेतृत्व कौशल्याचं गुपित

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी भारताचा उपकर्णधार तिलक वर्माने आपल्या नेतृत्व कौशल्याचे गुपित आणि कर्णधार श्रेयस अय्यरसोबतच्या संवादाबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Published On: 

Tilak Varma addressing press conference ahead of IND vs NZ 4th T20I

प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: २०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवले, तर २३ वर्षीय तिलक वर्माची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली. आता न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी भारताच्या या उपकर्णधाराने आपल्या वाढत्या नेतृत्व कौशल्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.

श्रेयस अय्यर त्याच्या नेतृत्व कौशल्यासाठी आधीपासूनच ओळखला जात होता, परंतु टिळक वर्माची ओळख प्रामुख्याने आक्रमक मध्यफळीतील फलंदाज अशी होती. त्यामुळे जेव्हा बोर्डाने त्याला अय्यरचा उपकर्णधार बनवले, तेव्हा काहींच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या. यावर ऑकलंडमध्ये चौथ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय टी-२० संघात नेतृत्व करताना आपण नवखे नसल्याचे त्याने पत्रकारांना सांगितले.

आपल्याला आधीच्या अनुभवामुळेच ही नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्याचे स्पष्ट करताना तिलक वर्मा म्हणाला, “नेतृत्वाबाबत बोलायचे तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मी माझ्या राज्यासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व केले आहे. तसेच गेल्या एका वर्षापासून मी इंडिया अ मालिका आणि इमर्जिंग संघाचेही नेतृत्व केले आहे. त्यामुळे माझ्याकडे तो अनुभव आणि ज्ञान आहे, जे मी मैदानावर नेहमीच सांगत असतो.”

कर्णधार श्रेयस अय्यरसोबतच्या संवादाबाबत बोलताना तो म्हणाला की, संवादातूनच यश मिळते. जेव्हा संधी मिळते तेव्हा तो आपले विचार अय्यरसोबत शेअर करतो आणि अय्यरदेखील सामन्यादरम्यान पुढील रणनीतीसाठी त्याच्याशी चर्चा करतो. तो म्हणाला, “कर्णधार म्हणून सर्वच गोष्टींवर लक्ष ठेवणे कठीण असते, त्यामुळे माझ्या आणि अय्यरमध्ये थोडा संवाद होतो, जिथे मी त्याला मदत करू शकतो. अय्यरदेखील मला विचारतो, त्यामुळे मी मैदानावर छोट्या भूमिका पार पाडतो. मी सध्या याचा आनंद घेत आहे आणि आम्ही एक चांगली जोडी म्हणून काम करत असल्याने चांगले निकाल मिळत आहेत.” बीसीसीआयनेही त्याच्या या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने केवळ औपचारिकतेचे राहिले असून, यजमान न्यूझीलंडसाठी ही फक्त प्रतिष्ठेची लढत असणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

२०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवले, तर २३ वर्षीय तिलक वर्माची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही