ठाणे, 29 ऑक्टोबर: ठाकरे शिवसेनेचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असून, या प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी मास्टरमाईंडला अटक कधी होणार, अशी विचारणा केली. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मास्टरमाईंडला वाचवायला एवढे उत्सुक का आहेत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘फेकनाथ’मध्ये हिंमत असती तर त्यांनी पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतली असती, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
राम पूर्णेकर यांना ताब्यात घेऊन अटक करायला सांगितल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आमची ताकद दिसल्यामुळेच मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा आला असून, खासदार नरेश म्हस्के हे शिवराळ भाषा वापरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी आज आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली.
पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आज टेंभीनाका परिसरात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. या प्रकरणात ठाकरे गटाकडून शिंदे सेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची सातत्याने मागणी होत आहे. गेले दोन दिवस ठाणे धगधगत असून, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आज पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. हत्येचा एक महिना उलटूनही ठोस तपास का होत नाही आणि संबंधितांना अटक न करण्यासाठी पोलिसांवर काही दबाव आहे का, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. याआधी माजी खासदार राजन विचारे यांनीही पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती.
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच कसे बोलत नाहीत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर, राज्याला मिळालेले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिसेल तिथं ठोकणार! ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रुपाली पाटील यांचा सुशील कुलकर्णींना भर चौकात बदडण्याचा इशारा
- ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीचा हात असण्याची शक्यता; रामदास आठवले यांचा गंभीर आरोप
- “उद्या यांना मुलं झाली तरी संजय राऊतांचे नाव घेतील”, ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा भाजपवर घणाघात
Quick Answers
आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'फेकनाथ' अशी टीका केली आणि त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतली असती असे म्हटले. तसेच एकनाथ शिंदे मास्टरमाईंडला वाचवायला एवढे उत्सुक का आहेत आणि मास्टरमाईंडला अटक कधी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात ठाकरे गटाकडून शिंदे सेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची सातत्याने मागणी होत आहे.
हत्येचा एक महिना उलटूनही ठोस तपास का होत नाही आणि संबंधितांना अटक न करण्यासाठी पोलिसांवर काही दबाव आहे का, अशी विचारणा त्यांनी पोलीस आयुक्तांना केली.
संजय राऊत यांनी म्हटले की, राज्याला मिळालेले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








