Share

५ हजार कोटींचा दावा ठोका; नवनाथ बन यांचे शिवराज मोरे यांना आव्हान, ड्रग्जप्रकरणी चौकशीची मागणी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरू झालेल्या वादात नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांना ५ हजार कोटींचा दावा ठोकण्याचे आव्हान देत पोलीस तपासाची मागणी केली.

Published On: 

Navnath Ban challenges Shivraj More over viral video controversy

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवनाथ बन (Navnath Ban) आणि शिवराज मोरे यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. नवनाथ बन यांनी केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवराज मोरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी बन यांच्यावर टीका करत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मोरे यांच्या या इशाऱ्यानंतर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन यांनी त्यांना थेट ५ हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे आव्हान दिले आहे.

या प्रकरणातील तरुणीबद्दल आपण कोणतेही अपशब्द वापरले नसल्याचे बन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांनी मोरे यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. मदतीसाठी गेले असता मोरे यांनी हाणामारी का केली आणि त्यासाठी ते आंदोलन सोडून का गेले, अशी विचारणा बन यांनी केली. तसेच, तरुणीला त्रास देणाऱ्याविरोधात मोरे यांनी कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि सापडलेले ड्रग्ज पोलिसांच्या स्वाधीन केले की स्वतःकडेच ठेवले, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

ड्रग्ज सापडल्यावर ते पोलिसांच्या स्वाधीन न करणे हा मोठा गुन्हा असल्याचे सांगत, पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे. या वादाव्यतिरिक्त, बन यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनावरही गंभीर आरोप केले. या आंदोलनात केवळ २० टक्के विद्यार्थी असून उर्वरित ८० टक्के लोक ‘बारामती ॲग्रो’चे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे आंदोलन विनाकारण ताणून राहुल गांधी यांना तिथे आणायचे आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्षपद मागायचे, असा यामागील उद्देश असल्याचा आरोपही बन यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

शिवराज मोरे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर, नवनाथ बन यांनी त्यांना थेट ५ हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे आव्हान दिले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही