प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: अजितदादा यांच्या विमान अपघाती निधनाला साडे नऊ महिने पूर्ण झाले असूनही या प्रकरणाचा तपास अद्याप झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, अजितदादांच्या मृत्यूमागे आमदार रोहित पवार हेच सूत्रधार नाहीत ना? अशी शंका उपस्थित करत त्यांचीच चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच एका प्रेझेंटेशनद्वारे या प्रकरणातील संशयितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवत असल्याचा सवाल उपस्थित केला होता. ‘व्हीएसआर’ विमान कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंग यांची चौकशी केली जात नाही, तसेच त्यांच्यावर एफआयआर दाखल न करता त्यांना वाचवले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यावरून भाजपा नेत्यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
अजितदादांच्या अपघातामागे फडणवीस आहेत असे आपण म्हणत नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस हे कंपनी मालकाच्या मुलांच्या लग्नाला उपस्थित होते आणि त्यांचे चांगले संबंध असल्याचा दावा करत, फडणवीस हेच त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना आमदार देवयानी फरांदे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला. अजितदादा गेल्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यावरून आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे फरांदे म्हणाल्या. रोहित पवार यांना त्यांचे काका अजितदादांची जागा घेण्याची घाई झाली असून त्यासाठीच त्यांचा हा आटापिटा सुरू आहे. मात्र राजकारणात जनताच जागा देत असते, ती कोणालाही परस्पर घेता येत नाही, असा टोलाही फरांदे यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








