अजित पवारांच्या विमान दुर्घटनेला रोहित पवारांच्या कारखान्याचा धूर जबाबदार? भाजपचा गंभीर आरोप

अजित पवारांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या कारखान्यातील धूर जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Published On: 

BJP spokesperson Navnath Ban accuses Rohit Pawar sugar factory smoke for Ajit Pawar plane crash

पुणे, 18 नोव्हेंबर: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतल्यानंतर, आता भाजपने त्यांच्यावरच पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या दुर्घटनेला इंदापूर तालुक्यातील रोहित पवारांचा ‘बारामती ॲग्रो’ साखर कारखाना जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तत्पूर्वी, रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल न झाल्याने व्हीएसआर कंपनीच्या रोहित सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच त्यांना पाठीशी घालत असून ते ‘मफलर मॅन’ आहेत, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली होती.

या आरोपांना उत्तर देताना नवनाथ बन यांनी अजितदादांच्या विमान अपघाताचा थेट संबंध रोहित पवारांच्या कारखान्याच्या धुराशी जोडला. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे रोहित पवारांचा हा साखर कारखाना आहे. या कारखान्यातून निघणारा धूर बारामती विमानतळावर गेल्यामुळे परिसरातील व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) कमी झाली. फेब्रुवारी महिन्यात तापमान कमी असल्याने धुराचा फॉग तयार झाला व पावणेनऊच्या सुमारास हा अपघात घडला, असा दावा बन यांनी केला.

गुगल नेव्हिगेशननुसार बारामती ॲग्रो कारखाना ते बारामती विमानतळ हे अंतर १७ किलोमीटर आहे, तर एरियल डिस्टन्स (हवेतील थेट अंतर) ६.३ किलोमीटर इतके आहे. यापूर्वी ६ मार्च २०२६ रोजी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी वैभव सोलणकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन याच कारखान्याच्या धुरामुळे अपघात झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती, याची आठवण नवनाथ बन यांनी करून दिली.

वैभव सोलणकर यांच्या आरोपांचा संदर्भ देत, साखर कारखान्याच्या धुरामुळे झालेल्या या अपघाताचा रोहित पवारांशी काही संबंध आहे का, अशी दाट शक्यता बन यांनी वर्तवली. या अपघातामागे किंवा घातपातामागे रोहित पवार अथवा त्यांचा साखर कारखाना कारणीभूत आहे का, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री आणि तपास यंत्रणांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही