Share

‘राणेंशी चांगले राहा’; निलेश राणेंचा विरोधकांना सूचक इशारा

आमदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, नियती कोणालाही माफ करत नाही आणि विरोधक स्वतःच ‘हिट-विकेट’ झाले आहेत, असे म्हटले.

Published On: 

Nilesh Rane

सिंधुदुर्ग: “ज्यांनी आयुष्यभर राणे कुटुंबाचा तिरस्कार केला आणि सतत त्यांची बदनामी केली, त्यांनी आज स्वतःच्याच कर्माने ‘हिट-विकेट’ (Hit Wicket) करून घेतला आहे.” अशा कठोर शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर नाव न घेता तीव्र टीका केली. नियती कोणालाही माफ करत नाही, म्हणूनच मी म्हणतो राणे कुटुंबाशी नेहमी चांगले राहा”

कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये ‘महायुती’च्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात आमदार निलेश राणे यांनी हे भाष्य केले. यावेळी त्यांनी विनायक राऊत यांच्यासमोर सध्या निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावरही कडक शब्दांत टीका केली.

माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यात राऊत कुटुंबाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि जादूटोणाविरोधी (Anti Black Magic Act) कायद्यांतर्गत गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.

पुढे निलेश राणे म्हणाले, “मागील २० वर्षांपासून काही लोकांनी केवळ राणेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा, त्यांची समाजात बदनामी करण्याचा आणि त्यांच्या मागे नको त्या यंत्रणा लावण्याचा उद्योग केला. एखाद्याबद्दल किती वाईट करायचे, याला काही मर्यादा असते की नाही? पण आज बघा, आम्हाला त्यांच्याविरुद्ध काहीही करावे लागले नाही, तर नियतीनेच (Destiny) त्यांना असा काही धडा शिकवला आहे की ते स्वतःच आपल्या घरातून ‘हिट विकेट’ झाले आहेत.”

पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले की, “राणे कुटुंब कधीही असले नको ते धंदे करत नाहीत आणि आमच्याकडे असल्या गोष्टींसाठी वेळही नाही. नियती कोणालाही माफ करत नाही. म्हणूनच तुम्हाला सांगतोय, राणेंशी चांगले राहा.” असे शेवटी कार्यकर्त्यांना आणि राजकीय विरोधकांना सूचक इशारा दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही