🕒 1 min read
मुंबई: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अध्यक्ष अभिजीत दिपके (Abhijit Dipke) आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिपके यांच्या या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे गट) पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे यांच्यावर टीका करताना उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून प्रश्न विचारला. उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गट ‘कॉकरोच जनता पार्टी’मध्ये विलीन होण्याची मानसिक तयारी करत आहे का?”
काय म्हणाले केशव उपाध्ये?
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये उपाध्ये यांनी म्हटले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ‘ विलीन होण्याची लालसा निर्माण झाली आहे का? मी उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहिली आणि ऐकली. ती पाहिल्यानंतर मनात एकच प्रश्न आला: अचानक उदयास आलेल्या तथाकथित ‘झुरळ जनता पक्षात’ विलीन होण्याची ‘उबठा’ गट मानसिक तयारी करत आहे का?”
“अभिजीत दीपके सध्या नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तथापि, नेहमीप्रमाणे, ठोस भूमिका किंवा स्पष्ट दिशा देण्याऐवजी, हा कार्यक्रम पोकळ वक्तृत्व, ‘हिंदुत्वा’चा देखावा, इतरांना उपदेश करणे आणि केवळ गोंधळ निर्माण करणाऱ्या विधानांनी भरलेला होता. आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करताना, देशातील तरुणांना या चळवळीत सामील होण्याचे आवाहनही करण्यात आले.”
काय म्हणाले केशव उपाध्ये ?
आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून उपाध्ये म्हणाले,‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद पूर्णपणे पाहिली आणि ऐकली. ती पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडला, अचानक स्थापन झालेल्या कथित ‘क्रोकरोच जनता पार्टी’मध्ये उबाठा गट विलीन होण्याची मानसिक तयारी तर सुरू नाही ना?
नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र नेहमीप्रमाणे ठोस भूमिका किंवा स्पष्ट दिशा न देता हवेत गोळीबार, ढोंगी हिंदुत्वाचा आव, इतरांना उपदेश आणि संभ्रम निर्माण करणारी विधाने एवढाच तिचा गाभा होता. आंदोलनाला पाठिंबा देतानाच देशातील तरुणांनाही त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले.
या कथित ‘क्रोकरोच जनता पार्टी’च्या सदस्यत्वासाठी जर काही निकष असतील, तर ते पूर्ण करण्यात उबाठा गटाला कोणतीच अडचण येणार नाही.
पहिली अट म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात सातत्याने अवमानकारक भाषा वापरणे. हे तर उबाठा गटाचे रोजचे कामच झाले आहे.
दुसरी अट म्हणजे दिशाहीन बडबड आणि केवळ आव्हानांची भाषा “हिम्मत असेल तर…” अशा प्रकारची वक्तव्ये. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी वास्तवाच्या कसोटीवर अपयशी ठरूनही ही शैली मात्र कायम आहे.
श्रीमंत उद्धवपंतांची पत्रकार परिषद म्हणजे मोदीजींनी काय करावे, हिंदूंनी काय करावे, महिलांनी काय करावे, तरुणांनी काय करावे, शेतकऱ्यांनी काय करावे याचा सल्लागार वर्गच असतो. स्वतःच्या जबाबदारीबाबत मात्र मौन आणि इतरांनीच सर्व काही करावे, असा त्यातून संदेश दिला जातो.
राहुल गांधींनाही आवाहन
केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, यावेळी त्यात आणखी एक भर पडली. राहुल गांधी यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी “मोलाची सूचना”ही त्यांनी केली. म्हणजे इतरांनी रस्त्यावर उतरावे, पण आपण मात्र ‘मातोश्री’च्या बाहेर पडणार नाही, एवढेच त्यांना बहुधा सांगायचे असावे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढणार! राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार? फेरनिवडणुकीची मागणी
- शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट! ‘पहाटेच्या शपथविधीचीही होती पूर्ण कल्पना’; ‘या’ आमदाराचा दावा
- ‘विश्वगुरू-विश्वगुरू म्हणणं थांबवा’; अनुराधा पौडवालांची मोदी सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












