पुणे– सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पार्थ पवारांसोबत दिसलेली ‘ती’ मिस्ट्री गर्ल नक्की कोण होती? गेले अनेक दिवस राजकीय वर्तुळात या एकाच प्रश्नाची दबक्या आवाजात चर्चा होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या २९ जुलै रोजी पुण्यात त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे.
Parth Pawar Engagement: कायनात धार सोबत पार्थ पवार बांधणार लग्नगाठ
पार्थ पवार यांची भावी पत्नी कायनात धार सध्या दिल्लीत कार्यरत आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिल्यापासूनच त्यांच्या नात्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. मध्यंतरी हे दोघेही उज्जैनच्या महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेताना दिसले होते. विशेष म्हणजे, केवळ सुखाच्याच नाही तर दुःखाच्या प्रसंगातही कायनात पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.
जानेवारी महिन्यात विमान अपघातात अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं. या कठीण काळात बारामतीत येऊन तिने (Kaynaat Dhar) कुटुंबाचं सांत्वन केलं होतं, तसेच वरळीतील शोकसभेलाही त्यांची उपस्थिती होती. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा आली, तर दुसरीकडे पार्थ पवार दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आता पार्थ आणि कायनात यांच्या नव्या नात्यामुळे दादांच्या घरी पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत.
Who is Kainat Dhar
कायनात धार मूळची काश्मीरची असून आणि सध्या दिल्लीत राहणारी (Who is Kainat Dhar) कायनात आणि पवार कुटुंबाचे अगदी जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मागे सुनेत्रा पवार काश्मीर दौऱ्यावर असताना त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी कायनातच्याच कुटुंबाने घेतली होती. तेव्हापासूनच ही जवळीक वाढल्याचे सांगण्यात येते.
पार्थ पवार आणि कायनात (Kaynaat Dhar) यांची चांगली मैत्री असल्याचे बोलले जाते. काही महिन्यांपूर्वी हे दोघे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेताना दिसले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- EPFO EDLI Scheme: नोकरदारांची चांदी! पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या फ्री विम्यासह आता १ लाखाचा वाढीव बोनस कसा मिळणार?
- सोलापूर हादरलं: लग्न होऊन अवघे दोन महिने, २६ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल का उचललं?
- वैभव सूर्यवंशीवरून निवडकर्त्यांना सुनावलं! टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी क्रिकेटर रोखठोक बोलला
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








