Share

रेवती सुळेंच्या शाही लग्नात दिग्गजांची मांदियाळी; पण पार्थ पवारांसोबत आलेल्या ‘त्या’ चेहऱ्याचीच सर्वाधिक चर्चा!

रेवती सुळे यांच्या शाही विवाहसोहळ्यात दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. मात्र, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांसोबत आलेल्या कायनात धारच्या एन्ट्रीची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे.

Published On: 

Revati Sule Sarang Lakhani wedding ceremony guests and Kaynaat Dhar with Parth Pawar

🕒 1 min read

मुंबई – देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातल्या लग्नात जेव्हा शाहरुख खान डान्स करतो आणि अंबानी-अदानी एकाच छताखाली येतात, तेव्हा साहजिकच डोळे दीपून जातात. पण सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या शाही विवाहसोहळ्यात या दिग्गजांपेक्षाही एका वेगळ्याच नावाची राजकीय वर्तुळात सर्वाधिक कुजबूज सुरू होती, ते नाव म्हणजे कायनात धार!

शरद पवार यांच्या नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा विवाहसोहळा काल मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात पार पडला. भाजप आमदार अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग यांच्याशी तिची लग्नगाठ बांधली गेली. सारंग हे एक यशस्वी उद्योजक असून ‘विश्वराज ग्रुप’चे कार्यकारी संचालक आहेत. या सोहळ्याला राजकीय, औद्योगिक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. पण खरी चर्चा रंगली ती कायनात धार हिच्या ग्रँड एन्ट्रीमुळे.

कायनात धार-पार्थ पवारांची एन्ट्री अन् चर्चांना उधाण

कायनात धार हिने थेट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत या लग्नात प्रवेश केला. मूळची काश्मीरची आणि सध्या दिल्लीत राहणारी (Who is Kainat Dhar) कायनात आणि पवार कुटुंबाचे अगदी जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मागे सुनेत्रा पवार काश्मीर दौऱ्यावर असताना त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी कायनातच्याच कुटुंबाने घेतली होती. तेव्हापासूनच ही जवळीक वाढल्याचे सांगण्यात येते.

पार्थ पवार आणि कायनात (Kaynaat Dhar) यांची चांगली मैत्री असल्याचे बोलले जाते. काही महिन्यांपूर्वी हे दोघे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेताना दिसले होते. त्यांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कायनात केवळ आनंदाच्याच प्रसंगात नाही, तर पवार कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या प्रसंगातही त्यांच्यासोबत उपस्थित असते. नुकत्याच झालेल्या पवार कुटुंबातील काही कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्येही तिने हजेरी लावली होती. मात्र, या दोन्ही कुटुंबांमधील नेमक्या नात्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

या भव्य सोहळ्याला शरद पवार, राहुल गांधी, सरसंघचालक मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह देशभरातील अनेक बडे नेते उपस्थित होते. उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि गौतम अदानी यांनीही सहकुटुंब हजेरी लावली. तर बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही