Share

NEET विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बसेस, पण मुंबईत बेस्ट संपाचा अडथळा

NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यांत विद्यार्थ्यांसाठी विशेष बस व्यवस्था करण्यात आली असताना मुंबईतील बेस्ट संप कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी संप सुरू असल्याने मुंबईकरांसह परीक्षार्थींना प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Published On: 

NEET विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बसेस, पण मुंबईत बेस्ट संपाचा अडथळा

NEET Exam :  रविवारी होणाऱ्या NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये परीक्षार्थींसाठी स्पेशल बसेसची सोय करण्यात आली असताना, मुंबईत मात्र बेस्ट (BEST)  कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मुंबईची दुसरी लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या बेस्टचा संप शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांनी हा संप पुकारला असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून बससेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या संपामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युइटीची देणी देणे आणि बेस्टचे मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांच्यासोबत बैठक घेतली. मात्र, बैठकीनंतरही संप मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान, NEET परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने रविवारी होणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून मिळालेला हा दिलासा असला तरी बेस्ट संपामुळे प्रवासाचा प्रश्न कायम आहे.

मुंबईत सध्या कडाक्याच्या उकाड्यात स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आता बेस्ट संपावर तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही