Share

शिंदे गटात खळबळ! माजी नगरसेवकासह 7 जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

कल्याणमधील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्यासह सात जणांवर ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन व्यवहार केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

Published On: 

शिंदे गटात खळबळ!

🕒 1 min read

Kalyan Land Scam : कल्याणमधील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात (Kalyan Land Scam) शिवसेना (Shivsena) शिंदे गटचे माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख सुनील वायले (Sunil Wayle) यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबाची फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार प्रमोद विश्वनाथ गायकवाड (Pramod Vishwanath Gaikwad) यांच्या म्हणण्यानुसार, ८ मार्च २०२२ ते १८ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून एका मृत व्यक्तीच्या नावाने खोटे दस्तऐवज तयार केले. त्या व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे. तसेच, अनुसूचित जातीतील तक्रारदारांवर अन्यायकारक आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार करण्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सुनील वायले यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, सुनील वायले यांनी सर्व आरोप फेटाळले असून ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित जमीन कायदेशीर पद्धतीने खरेदी करण्यात आली असून सर्व कागदपत्रे वैध आहेत. मात्र या प्रकरणामुळे कल्याणमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही