Share

भक्तीस्थळी मृत्यूचा थरार! निर्माणाधीन मंदिर कोसळून 7 भाविकांचा बळी

परभणीतील मानवत तालुक्यात निर्माणाधीन हनुमान मंदिराचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांसाठी बचावकार्य सुरू असून प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Published On: 

भक्तीस्थळी मृत्यूचा थरार! निर्माणाधीन मंदिर कोसळून 7 भाविकांचा बळी

परभणी : जिल्ह्यातील मानवत तालुक्यात शनिवारी (20 जून 2026) मोठी दुर्घटना घडली आहे. श्रीक्षेत्र यशवाडी (Yashwadi Temple) येथील निर्माणाधीन हनुमान मंदिराचे छत अचानक कोसळल्याने भक्तीस्थळी मृत्यूचा थरार पाहायला मिळाले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शनिवार असल्याने मारुतीरायाच्या दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या बांधकामाचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेनंतर मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला.

घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग, आपत्कालीन पथके आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मंदिराचे बांधकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. मात्र, बांधकाम सुरू असतानाच छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही