‘विश्वगुरू-विश्वगुरू म्हणणं थांबवा’; अनुराधा पौडवालांची मोदी सरकारवर टीका

प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीत ‘विश्वगुरू’ संकल्पनेवर प्रश्न उपस्थित करत शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगत सरकारवर टीका केली.

Published On: 

Anuradha Paudwal

मुंबई: अलीकडील एका मुलाखतीत, प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील विविध पैलूंवर भाष्य केले. अनुराधा पौडवाल यांनी केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. भारत खऱ्या अर्थाने ‘विश्वगुरू’ कसा बनू शकेल, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकारवर (Modi Government) टीका करताना त्या म्हणाल्या की, ‘विश्वगुरू’ बनण्याचे स्वप्न सध्या चुकीच्या दिशेने नेले जात आहे.

या व्हिडीओ मध्ये अनुराधा पौडवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “काही वर्षांपूर्वीपर्यंत मलाही ‘विश्वगुरू’ बनण्याची इच्छा होती, पण आता अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत ज्या या संकल्पनेलाच कलंकित करत आहेत. त्यामुळे एकतर हा मूर्खपणा थांबवा. ‘विश्वगुरू-विश्वगुरू’ म्हणणे थांबवा.” आपण शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य दिले पाहिजे, ९३,००० शाळा आधीच बंद पडल्या आहेत.”

अनुराधा पौडवाल यांनी शुभंकर मिश्रा यांच्यासोबतच्या मुलाखतीत आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “‘विश्वगुरू’ बनण्याचा पाया काय आहे? राम मंदिरही लुटले गेले. मला अशा घटनांची यादी पाठवा जेणेकरून आपण त्या सोडवण्यासाठी काम करू शकू.”

अनुराधा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

अनुराधा पौडवाल यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच ओडिशा चित्रपटसृष्टीत काम केले आहे. त्या सर्वात लोकप्रिय भजन गायिका आणि बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी गायकांपैकी एक मानल्या जातात. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, सहा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन ओडिशा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही