Share

‘ते कलाकार नाहीत…’; गार्गी फुलेंचा रीलस्टार्सवर घणाघात, १०० रुपयांसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेला सुनावले खडेबोल

पुण्यातील टोलनाक्यावर रीलस्टार महेश मोटेच्या राड्यानंतर अभिनेत्री गार्गी फुले यांनी सडकून टीका केली आहे. रीलस्टार हे कलाकार नसतात, असं परखड मत त्यांनी मांडलं.

Published On: 

Gargi Phule On Mahesh Mote viral toll plaza video controversy and reaction.

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवले म्हणजे एखादी व्यक्ती खरंच ‘सुपरस्टार’ बनते का? आजकाल ‘मी रीलस्टार आहे, मला ओळखत नाही का?’ असा रुबाब झाडत रस्त्यावर दादागिरी करणाऱ्यांची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

नुकतंच पुणे-पंढरपूर महामार्गावरील एका टोलनाक्यावर महेश मोटे या तथाकथित रीलस्टारने शंभर रुपयांसाठी घातलेला हाय-व्होल्टेज ड्रामा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. या घटनेनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या वागणुकीवर जोरदार टीका सुरू झाली आहे. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गार्गी फुले (Gargi Phule) यांनी याच मुद्यावर बोट ठेवत रीलस्टार्सना त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे.

Gargi Phule On Mahesh Mote

‘राजश्री मराठी’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत गार्गी फुले यांनी अत्यंत परखड शब्दांत आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, “मी आधीही सांगितलंय, रीलस्टार हे काही कलाकार नाहीत. केवळ फॉलोअर्सची संख्या बघून काही चॅनेल्सनी त्यांना कामं दिली असतील. पण ते फक्त स्टार्स आहेत, अभिनेते नाहीत.”

अभिनय ही एक साधना आहे आणि त्यासाठी खऱ्या कलाकारांनी आपली दहा-दहा वर्षं घासलेली असतात, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे एखाद्या रीलस्टारने उठून स्वतःला थेट अभिनेता म्हणवणं हे अजिबात योग्य नाही, असं स्पष्ट मत त्यांनी नोंदवलं. या रोखठोक विधानामुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला, तरीही आपल्या मतावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महेश मोटेच्या (Mahesh Mote) त्या व्हायरल व्हिडीओचा संदर्भ देत गार्गी फुले यांनी चांगलीच खिल्ली उडवली. “तुम्ही रीलस्टार आहात म्हणजे नक्की कोण आहात? टोल देणं हा सरकारचा नियम आहे, मग तुम्ही तो द्या ना. मला ते बघून गंमतच वाटली,” असा सडेतोड सवाल त्यांनी उपस्थित केला.

सध्या इंटरनेटवर हे सर्व फुकट पाहायला मिळतंय, म्हणूनच लोकं बघत आहेत. उद्या जर या कंटेंटवर पैसे लावले, तर कुणीही हे बघणार नाही, असा दावा त्यांनी केला. एका रीलस्टारचा सिनेमा कसा दणकून फ्लॉप झाला आणि त्याला कुणीही पाहायला गेलं नाही, याचा दाखला देत अभिनयाची कला वयावर अवलंबून नसते, ती आयुष्यभर टिकते, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही