🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील 8 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने प्रादेशिक कार्यालयांना सदस्यांच्या PF खात्यांमध्ये 8.25 टक्के वार्षिक व्याज जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारची (Central Govt) मंजुरी मिळाल्यानंतर आता व्याज जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.
EPFO ने आपल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना योजनेच्या कलम 60(1) अंतर्गत पात्र सदस्यांच्या खात्यांमध्ये मंजूर व्याजदरानुसार व्याज जमा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे लवकरच लाखो खातेदारांच्या PF खात्यांमध्ये व्याजाची रक्कम दिसू लागण्याची शक्यता आहे.
यंदा व्याज जमा होणार अधिक वेगाने
मिळालेल्या माहितीनुसार, EPFO ने अलीकडेच डेटाबेस इंटिग्रेशन आणि सॉफ्टवेअर अपग्रेड पूर्ण केले आहे. या तांत्रिक सुधारणांमुळे व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद होणार आहे. याआधी सर्व सदस्यांच्या खात्यांमध्ये व्याज जमा होण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असे. मात्र यंदा ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
8.25% व्याजदर कायम
मार्च 2026 मध्ये EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. जून महिन्यात अर्थ मंत्रालयाने या व्याजदराला अंतिम मंजुरी दिल्यानंतर आता सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी EPFO ने 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवला आहे.
PF खात्यातील शिल्लक कशी तपासाल?
EPF सदस्य आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम अनेक सोप्या पद्धतींनी तपासू शकतात.
- नोंदणीकृत मोबाईलवरून SMS पाठवून
- Missed Call सुविधेद्वारे
- UMANG App वापरून
- EPFO Member Portal वर लॉगिन करून
यासाठी सदस्यांचा UAN क्रमांक सक्रिय असणे आणि मोबाईल क्रमांक EPFO मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- २५ कोटींच्या नोटिशीवर दीपाली सय्यद यांचे प्रत्युत्तर; ‘सिनेमाची इतकी भीती का?’
- Jayant Patil-Vinod Tawde Meeting : राजकीय चर्चांना उधाण; महायुतीच्या चर्चांवर राष्ट्रवादीची भूमिका काय?
- Teachers Protest : BLO ड्युटीतून मुक्ततेसाठी शिक्षकांचा एल्गार; ९ जुलैला राज्यभर आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












