🕒 1 min read
पी एफ (PF) चे पैसे काढायचे म्हटले की डोक्याला ताप… फॉर्म भरा, क्लेम टाका आणि मग पैशांसाठी दिवसांचे दिवस वाट पाहा! पण आता हे सगळं चित्र बदलणार आहे. नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता तुम्ही चक्क UPI द्वारे तुमच्या पीएफ खात्यातील पैसे काढू शकणार आहात. विश्वास बसत नाहीये? पण EPFO (Employee Provident Fund Organization) लवकरच हे शक्य करणार आहे.
केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार, ईपीएफओ एका अशा नव्या कोऱ्या मोबाईल ॲपवर (New App) काम करत आहे, ज्यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी होणार आहे. हे हायटेक ॲप येत्या एप्रिल महिन्यापासून (April) लाँच होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पैसे काढण्यासाठी ‘उमंग’ ॲप किंवा यूएएन (UAN) वेबसाईटचा आधार घ्यावा लागतो, पण नवीन ॲपमध्ये थेट युपीआयची सुविधा मिळणार असल्याने नोकरदारांचा मोठा वेळ वाचणार आहे.
EPFO Big Update
सध्या ईपीएफओ या ॲपची १०० डमी अकाऊंटवर चाचणी (Testing) करत आहे. तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतरच हे ॲप सर्वांसाठी खुले केले जाईल. विशेष म्हणजे, या ॲपद्वारे तुम्हाला तुमच्या पासबुकमधील शिल्लक रक्कमही एका क्लिकवर पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच ईपीएफओने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा १ लाखावरून ५ लाखांपर्यंत वाढवली होती. आता आजारपण, शिक्षण किंवा घरकामासाठी पैसे हवे असतील, तर हे नवीन ॲप कर्मचाऱ्यांसाठी ‘संजीवनी’ ठरणार आहे. ८ कोटींहून अधिक खातेदारांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बापरे! आधी रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार,आता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज; थेट व्हॉटसअपवर…
- “सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू..”; नितेश राणेंचा हल्लाबोल, वाद चिघळणार?
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; म्हाडा देणार हक्काचं घर! मार्चमध्ये ‘इतक्या’ घरांची सोडत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











