EPFO ची मोठी घोषणा: PF खात्यातून आता ९० टक्के रक्कम काढता येणार, दाव्यांचा ३ दिवसांत निपटारा

EPFO कडून पीएफ खातेधारकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येणार असून ५ लाखांपर्यंतचे दावे ३ दिवसांत निकाली निघणार आहेत.

Published On: 

EPFO PF Withdrawal new rules and pension updates

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: ईपीएफओ (EPFO) बोर्डाने पीएफ खातेधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अनेक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार, खातेधारकांना त्यांच्या खात्यातील ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली असून, केवळ १० टक्के रक्कम खात्यात ठेवणे अनिवार्य असेल. पूर्वी खात्यात २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक होते. म्हणजेच, जर एखाद्याच्या खात्यात एक लाख रुपये असतील, तर तो आता ९० हजार रुपये काढू शकतो.

काही विशिष्ट कारणांसाठी अंशतः रक्कम काढण्याच्या नियमातही सवलत देण्यात आली आहे. यासाठी लागणारा किमान वर्गणीचा कालावधी १२ महिन्यांवरून थेट २ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच, अचानक नोकरी गेल्यास कर्मचाऱ्यांना अवघ्या २ महिन्यांत पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढता येईल. लग्न, वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण आणि घराशी संबंधित गरजांसाठी ही रक्कम काढता येते. अनेकजण निवृत्तीसाठी आणि चांगल्या व्याजासाठी या पैशांना हात लावत नाहीत.

पीएफ काढण्याची प्रक्रिया आता वेगवान झाली असून ‘CITES’ प्रणालीद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे पात्र दावे साधारणपणे तीन दिवसांत निकाली काढले जात आहेत. मात्र, हा जलद निपटारा खातेधारकांच्या नोंदी आणि केवायसी (KYC) किती अचूक आहेत, यावर अवलंबून असतो.

दरम्यान, सप्टेंबर २०१४ पासून लागू असलेल्या ‘EPS-95’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या १,००० रुपयांच्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यावरही चर्चा सुरू आहे. या पेन्शनमध्ये तिप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी ईपीएफओ बोर्डाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, अनिवार्य पेन्शन योगदानासाठी असलेल्या वेतनाची मर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची सुधारणा नुकतीच नियमात करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही