सलमान खानने मागितली श्रद्धा कपूरची जाहीर माफी; बॉक्स ऑफिसवरील क्लॅश ठरले कारण

आगामी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील क्लॅशमुळे अभिनेता सलमान खानने श्रद्धा कपूरची जाहीर माफी मागितली आहे.

Published On: 

Somy Ali makes serious allegations against actor Salman Khan

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: अभिनेता सलमान खान आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सलमानने एका जाहीर कार्यक्रमात श्रद्धा कपूरची माफी मागितली आहे. सलमानचा ‘मातृभूमी’ आणि श्रद्धाचा ‘ईठा’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने त्याने ही दिलगिरी व्यक्त केली आहे.

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात सलमान खान आणि अभिनेत्री चित्रांगदा उपस्थित होते. यावेळी त्यांना ‘मातृभूमी’सह ‘ईठा’ चित्रपटाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर चित्रांगदाने श्रद्धा कपूरचे कौतुक केले. “श्रद्धा कपूर एक चांगली अभिनेत्री आहे आणि दोन्ही चित्रपट चांगले आहेत. दोघांनाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळेल,” असा विश्वास चित्रांगदाने व्यक्त केला.

याच वेळी सलमानने सर्वांसमोर श्रद्धाची माफी मागितल्याचा खुलासा केला. “ईठासाठी चीअर्स. पण मला वाईट वाटतंय. मी श्रद्धाशी बोललो आणि तिची माफी मागितली,” असे सलमान म्हणाला. यावर श्रद्धाने दिलेल्या प्रतिक्रियेबाबत सांगताना सलमान म्हणाला की, श्रद्धाने त्याला, “नाही सर, मी आनंदी आहे, दोन्ही चित्रपट चांगले आहेत,” असे उत्तर दिले.

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांबाबतचे कारण स्पष्ट करताना सलमानने सांगितले की, ‘मातृभूमी’ मूळतः २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता, पण त्यावेळी सूरज बडजात्या यांचा चित्रपट येत होता. त्यानंतर २४ डिसेंबरला शाहरुख खानचा चित्रपट असल्याने तिथेही त्याला टक्कर द्यायची नव्हती. तसेच २६ जानेवारीला रणबीर, विकी आणि आलिया एकत्र येत असल्याने तो दिवसही वगळण्यात आला.

इतर मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा टाळण्यासाठी अखेर ‘मातृभूमी’ ४ डिसेंबरला प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, याच दिवशी श्रद्धाचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती, असे सलमानने स्पष्ट केले. “मला वाईट वाटलं. मला माहिती असतं तर मी तो रिलीज केला नसता. मी तिच्याशी बोललो आणि माफी मागितली,” असे सलमानने शेवटी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही