🕒 1 min read
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा भाईगिरी आणि गँगवॉरचा थरार सुरू झालाय की काय? असा प्रश्न पडण्यासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, आता सुपरस्टार रणवीर सिंगला (Ranveer Singh) थेट धमकीचा मेसेज आला आहे. या घटनेने संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टीच्या घराबाहेर फायरिंग झाली होती, ज्यामुळे इंडस्ट्री हादरली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी, भीतीचं वातावरण कायम आहे. आता हे प्रकरण शांत होत नाही तोच, रणवीर सिंगला एका व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे (WhatsApp Voice Note) धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये आरोपीने रणवीरकडे कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची (Extortion) मागणी केली आहे. या धमकीनंतर रणवीरने तातडीने मुंबई पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
Ranveer Singh Threat
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रणवीर सिंगच्या घराबाहेरची सुरक्षा (Security) वाढवली आहे. सध्या पोलीस सायबर सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. रोहित शेट्टीच्या घरावर झालेला हल्ला आणि रणवीरला आलेली धमकी यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? पोलीस या अँगलनेही तपास करत आहेत. दरम्यान, रोहित शेट्टीने खबरदारी म्हणून मित्रमंडळी आणि नातेवाईकांना सध्या घरी न येण्याचा सल्ला दिला आहे. सलमान खान पाठोपाठ आता रणवीर सिंगलाही टार्गेट केल्याने कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू..”; नितेश राणेंचा हल्लाबोल, वाद चिघळणार?
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; म्हाडा देणार हक्काचं घर! मार्चमध्ये ‘इतक्या’ घरांची सोडत
- ‘अमितजी, रेखाला स्वीकारा, दोन बायकांचा ट्रेंड..’; राखी सावंतने ओलांडली सीमा, जया बच्चननाही डिवचलं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











