Share

‘अमितजी, रेखाला स्वीकारा, दोन बायकांचा ट्रेंड..’; राखी सावंतने ओलांडली सीमा, जया बच्चननाही डिवचलं!

राखी सावंतने अमिताभ-रेखा नात्यावर आणि जया बच्चन यांच्या लूकवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. नेमकं काय म्हणाली राखी? वाचा सविस्तर.

Published On: 

Rakhi Sawant Statement: राखीची बच्चन कुटुंबावर वादग्रस्त टीका!

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) कधी काय बोलेल याचा कोणालाच नेम नाही. पण यावेळी तिने थेट महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरालाच टार्गेट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राखीने बिग बींना चक्क दुसरी बायको करण्याचा सल्ला दिलाय, हे ऐकून तुम्हीही कपाळाला हात लावाल! राखीने फक्त अमिताभच नाही, तर जया बच्चन यांच्या राहणीमानावरही आक्षेपार्ह टीका केल्याने सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे.

अमिताभ आणि रेखा यांच्या जुन्या नात्यावर भाष्य करताना ती म्हणाली, “अमितजी, आता रेखाजींना आपलंसं करून घ्या. आजकाल दोन-दोन बायका असण्याचा ट्रेंड चालू आहे. आयुष्य एकच आहे, ते मनमुराद जगा. ‘तुम होती तो ऐसा होता’ असं वाटायला नको.” राखीच्या या अजब सल्ल्याने नेटकरीही अवाक झाले आहेत.

Rakhi Sawant Statement On Amitabh Bachchan

राखी इथेच थांबली नाही, तर तिने जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावरही निशाणा साधला. जयाजींच्या साध्या राहणीमानाची खिल्ली उडवत राखी म्हणाली, “जयाजी इतक्या श्रीमंत असूनही नीट सलवार-कमीज घालत नाहीत. तुम्ही मला तुमच्या बर्थडे पार्टीला बोलवा, मी तुम्हाला छान सूट गिफ्ट देईन. थोडं बोटॉक्स (Botox) करा, केसांना कलर करा, तुमचे पती अमिताभ आहेत, हे विसरू नका.”

इतकंच नाही तर, “अमिताभ यांनी रेखाऐवजी जया यांची निवड का केली, हे मला अजूनही कळत नाही. मला निवडायला सांगितलं तर मी नक्कीच रेखाजींनाच निवडेन,” असं म्हणत राखीने या वादात तेल ओतलं आहे. राखी नेहमीच प्रसिद्धीसाठी काहीही बोलते, पण यावेळी तिने थेट कलाकारांचा अपमान केल्याने चाहत्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही