📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

BCCI चा ‘गुलिगत’ धोका; रोहित-विराटचं डिमोशन, शुभमन गिल मालामाल, तर ‘हे’ 5 दिग्गज बाहेर!

बीसीसीआयच्या करारात मोठा उलटफेर! रोहित-विराटचं डिमोशन, शुभमन गिल टॉपवर, तर ईशान किशन आणि शमीला डच्चू. वाचा कोणाला कोणती ग्रेड?

Published On: 

BCCI Central Contract: रोहित-विराटचं डिमोशन! ईशान किशन, शमी बाहेर

🕒 1 min read

भारतीय क्रिकेटमध्ये नक्की चाललंय तरी काय? टीम इंडियाच्या ‘दादा’ खेळाडूंनाही आता आपल्या जागेची शाश्वती राहिलेली नाही, याचा प्रत्यय आज पुन्हा आलाय. बीसीसीआयने (BCCI) नव्या वर्षासाठी केंद्रीय कराराची (Central Contract) यादी जाहीर केली आणि क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे, ज्यांच्या नावावर भारतीय क्रिकेट चालतं, त्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) चक्क ‘डिमोशन’ मिळालंय!

बीसीसीआयच्या या नव्या यादीनुसार, कसोटी आणि वनडेची धुरा सांभाळणाऱ्या शुभमन गिलचं (Shubman Gill) मात्र नशीब फळफळलं आहे. त्याला थेट प्रमोशन मिळालं असून तो आता ‘ग्रेड A’ मध्ये विराजमान झालाय. त्याच्यासोबतीला जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनीही आपलं ‘अ’ स्थान टिकवून ठेवलंय. पण, रोहित आणि विराट सारख्या दिग्गजांना आता ‘ग्रेड B’ मध्ये समाधान मानावं लागल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

BCCI Central Contract

दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये जागा मिळवूनही ईशान किशनला (Ishan Kishan) बीसीसीआयने कराराच्या यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटकडे पाठ फिरवल्याचा फटका त्याला पुन्हा एकदा बसलाय. इतकंच नाही तर, रणजी गाजवूनही वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) यादीतून वगळण्यात आलं आहे. याशिवाय सरफराज खान, रजत पाटीदार आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंनाही करारातून डच्चू मिळाला आहे.

बीसीसीआयची नवी केंद्रीय करार यादी:

ग्रेड A (कोटींची उड्डाणे): शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा.

ग्रेड B (मोठे धक्के): रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज.

ग्रेड C (युवा ब्रिगेड): अक्षर पटेल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, शिवम दुबे, रवी बिश्नोई आणि इतर.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!