Share

शिफारशीसाठी मंत्र्याचा फोन? प्रसिद्ध गायकाने थेट नंबर केला ब्लॉक; म्हणाला ‘अशा लोकांबद्दल मला माझ्या मनात….’

शिफारशीसाठी आलेल्या मंत्र्याचा नंबरच विशाल ददलानीने केला ब्लॉक! गायकांना दिला सज्जड दम, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Published On: 

Vishal Dadlani Angry: शिफारशीसाठी मंत्र्याचा फोन? विशालने थेट...

बॉलिवूडमध्ये नेपोटिझम आणि ‘वशिलेबाजी’वरून नेहमीच राडा होतो, पण आता प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानीने (Vishal Dadlani) जे केलंय, त्याने इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. राजकारण्यांचा फोन आला की भलेभले नमतात, पण विशालने काय केलं? त्याने चक्क एका मंत्र्याचा नंबरच ब्लॉक (minister number Block) करून टाकला! होय, हे खरं आहे.

एका नवोदित गायकाला काम मिळावं म्हणून थेट एका मंत्र्यांचा फोन आला होता, पण या शिफारशीचा विशालला इतका राग आला की त्याने त्या मंत्र्याला आणि त्या गायकालाही थेट ब्लॉक लिस्टमधल्या स्वर्गात पाठवलं. नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विशालने सोमवारी इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट लिहित या प्रकरणाचा ‘भांडाफोड’ केला. त्याने नवोदित कलाकारांचे कान टोचताना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

Vishal Dadlani Blocks Minister Number

तो म्हणाला, “नवोदित गायकांसाठी एक मोफत सल्ला… कोणत्याही मंत्र्याला किंवा त्यांच्या पीएला मला फोन करायला लावू नका. जर तुम्ही असं केलं, तर मी तुम्हाला कधीच भेटणार नाही. जे लोक ‘वशिलेबाजी’ किंवा राजकीय ओळखीचा वापर करून शॉर्टकटने काम मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दल माझ्या मनात शून्य आदर (Zero Respect) आहे.”

विशाल इथेच थांबला नाही. ज्याने ही शिफारस आणली होती, त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “संबंधित मंत्र्यांना आणि त्या गायकाला मी ब्लॉक केलं आहे. आता तुम्ही कितीही चांगले गायक असलात तरी मला तुमच्यासोबत काम करण्यात काडीचाही रस नाही.” त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे.

विशालने कोणाचं नाव घेतलं नसलं तरी, त्याचा रोख कोणाकडे आहे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेटकऱ्यांनी मात्र “भावा, एकच नंबर!” म्हणत विशालच्या या ‘डेअरिंग’चं कौतुक केलंय. टॅलेंट असेल तर काम मिळेल, पण राजकारण्यांच्या ओळखीने माझ्याकडे येऊ नका, असा सज्जड दमच त्याने दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही