📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

अखेर ठरलं! भारत-पाक सामन्याचा मुहूर्त निघाला; ‘या’ दिवशी कोलंबो दणाणणार!

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार आहे. पीसीबी आणि आयसीसीच्या बैठकीत तोडगा निघाला.

Published On: 

IND vs PAK T20 WC: भारत-पाक सामना फिक्स! तारीख आणि ठिकाण जाहीर

🕒 1 min read

‘भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होणार की नाही?’ या एका प्रश्नाने गेल्या काही दिवसांपासून जगभरातील क्रिकेटप्रेमींचा जीव टांगणीला लावला होता. पण आता चाहत्यांसाठी एक मोठी ‘गुड न्यूज’ समोर आली आहे. सर्व बाजूला सारत अखेर या महामुकाबल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

T20 World Cup 2026 च्या थरारात आता खरी रंगत येणार आहे. कारण, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) येत्या 15 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. हा सामना झाला नसता तर प्रायोजक आणि ब्रॉडकास्टर्सचं कोट्यवधींचं नुकसान झालं असतं, त्यामुळे आयसीसी आणि पीसीबीमध्ये जोरदार खलबतं सुरू होती.

IND vs PAK T20 WC

लाहोरमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आयसीसी (ICC) अधिकाऱ्यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. पाकिस्तानने काही अटींसह खेळायला होकार दिला आहे. या बैठकीत बांगलादेश आणि पाकिस्तानच्या मागण्यांवर चर्चा झाली. बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं होतं, त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून त्यांना अंडर-19 किंवा महिला वर्ल्ड कपच्या यजमानपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानने पैशांचा मुद्दा लावून धरला होता. आयसीसीच्या उत्पन्नातील वाटा (सध्या 5.75% म्हणजे 34-35 दशलक्ष डॉलर) वाढवण्याची मागणी पीसीबीने केली आहे, ज्यावर विचार करण्याचं आश्वासन आयसीसीने दिलं आहे. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतासोबत द्विपक्षीय मालिकेचा (Bilateral Series) राग आळवला होता. पण आयसीसीने ही मागणी थेट फेटाळून लावली आहे. “हे प्रकरण आमच्या कार्यकक्षेत येत नाही,” असं आयसीसीने स्पष्ट केलंय. त्यामुळे 2012 नंतर बंद झालेली ही मालिका तूर्तास तरी सुरू होण्याची चिन्हं नाहीत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!