Share

“भारताने हे करावं, तरच खेळणार”; पाकिस्तानने ICC समोर ठेवल्या 3 अटी, ‘ही’ मागणी पूर्ण होणं अशक्य!

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पाकिस्तानने ICC समोर ठेवल्या 3 अटी. द्विपक्षीय मालिका आणि हँडशेकच्या मागणीमुळे पेच निर्माण झालाय. वाचा सविस्तर.

Published On: 

Ind vs Pak T20 WC: पाकिस्तानच्या 3 अटी; भारताने धुडकावली 'ही' मागणी!

भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) मॅच होणार की नाही? हा प्रश्न सध्या सगळ्या क्रिकेट फॅन्सला पडलाय. मैदानावरचा थरार अनुभवता येईल की नाही, याबद्दल शंका असतानाच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवी चाल खेळली आहे. “आम्ही खेळू, पण…” म्हणत त्यांनी आता चक्क ICC च्या कोर्टात बॉल टाकलाय. 15 फेब्रुवारीला होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यावर सध्या अनिश्चिततेचे ढग आहेत, पण पाकिस्तानने आता बॉयकॉट मागे घेण्यासाठी तीन प्रमुख अटी समोर ठेवल्या आहेत.

रविवारी (8 फेब्रुवारी) दुबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी आयसीसी आणि बांगलादेश बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमोर पाकिस्तानची बाजू मांडली. विश्वचषकासारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये भारतासोबत खेळण्यासाठी पाकिस्तानने तीन अटी ठेवल्या आहेत, ज्या ऐकून तुम्हीही विचारात पडाल.

Ind vs Pak T20 WC

पाकिस्तानच्या नेमकं मागण्या काय?

पहिली अट म्हणजे, ICC कडून मिळणाऱ्या महसुलात (Revenue Share) वाढ हवी.

दुसरी आणि सर्वात मोठी अट म्हणजे, भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट मालिका (Bilateral Series) सुरू करावी.

तिसरी अट थोडी भावनिक आहे – टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी ‘हस्तंदोलन’ (Handshake) करावे.

आता मुद्दा असा आहे की, यातली दुसरी अट भारत मान्य करेल का? तर याचं उत्तर सरळ ‘नाही’ असं आहे. 2012 नंतर दोन्ही देशांत कोणतीही सीरीज झालेली नाही. त्यातच मागच्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने भूमिका अधिक कडक केली आहे. आशिया कप 2025 पासून तर Team India ने पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवणंही बंद केलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या या अटींवर बीसीसीआय आणि आयसीसी काय निर्णय घेणार, याकडे जगाचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही