Share

ICC चा मोठा निर्णय: वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपचा फॉरमॅट पूर्णपणे बदलला, आता सामने कसे होणार?

आयसीसीने आगामी वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला आहे. आता वनडेत ‘सुपर-७’ तर टी-२० मध्ये ‘सुपर-१०’ सह एलिमिनेटरचा थरार पाहायला मिळेल.

Published On: 

ICC World Cup New Format - Cricket match stadium and ICC logo.

एडिनबर्ग– क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. पुढच्या वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला नेहमीचे सामने पाहायला मिळणार नाहीत, कारण आयसीसीने थेट वर्ल्ड कपचा फॉरमॅटच बदलून टाकलाय!

एडिनबर्गमध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपमधील चुरस आणखी वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी समितीने केलेल्या शिफारशींनुसार हा नवा फॉरमॅट लागू होणार आहे. आता वनडे वर्ल्ड कपमध्ये ‘सुपर-७’ आणि टी-२० मध्ये ‘सुपर-१०’ सह थेट एलिमिनेटरचे थरारक सामने पाहायला मिळतील.

ICC World Cup New Format : ‘सुपर-७’ आणि ‘सुपर-१०’चा थरार

२०२७ चा वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात खेळवला जाणार आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात एकूण १४ संघ भिडतील. सुरुवातीला १२, १३ आणि १४ व्या क्रमांकावरील संघांमध्ये एक सुपर सिरीज होईल आणि त्यातील विजेता दुसऱ्या राऊंडमध्ये जाईल. पुढे १२ संघांची ६-६ च्या दोन गटात विभागणी होईल. दोन्ही गटांतील टॉप ३ आणि उर्वरित ६ संघांमधील सर्वोत्तम एक असे एकूण ७ संघ ‘सुपर-७’ साठी पात्र ठरतील. इथे राऊंड रॉबिन पद्धतीने २१ सामने होतील आणि टॉप चार संघ थेट उपांत्य फेरीत (सेमीफायनल) धडक मारतील. संपूर्ण स्पर्धेत एकूण ५७ सामने खेळवले जातील.

दुसरीकडे, २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही मोठे बदल करण्यात आलेत. यात २० संघ सहभागी होणार असून, ४ संघांचे ५ गट बनवले जातील. प्रत्येक गटातील टॉप २ संघ ‘सुपर-१०’ मध्ये जातील. त्यानंतर या १० संघांची ५-५ च्या दोन गटात विभागणी होईल. इथेच खऱ्या अर्थाने रंगत वाढणार आहे.

दोन्ही गटांतील पहिल्या क्रमांकावर असलेले संघ थेट सेमीफायनल गाठतील. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये ‘एलिमिनेटर’ सामने रंगतील आणि त्यातील दोन विजेते उपांत्य फेरीत पोहोचतील. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह काही प्रमुख संघ या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित जागांसाठी ग्लोबल क्वालिफायरचे सामने खेळवले जातील आणि त्यातून १६ पैकी ८ संघांची निवड केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही