Share

कोथरूडमध्ये भररस्त्यात कोयत्याने सपासप वार; निलेश घायवळ गँग पुण्यात पुन्हा डोके वर काढतेय?

पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली असून कोथरूडमध्ये अमित शिंदेवर जीवघेणा हल्ला झाला. यामागे घायवळ टोळीचा हात असल्याची शक्यता आहे.

Published On: 

Pune Crime News Kothrud koyta attack CCTV footage and Nilesh Ghaywal connection

पुणे – पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांनी डोकं वर काढलंय का? कोथरूडमध्ये मंगळवारी भररस्त्यात एका तरुणावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाचं आणि परदेशात पळून गेलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळचं (Nilesh Ghaywal) एक मोठं कनेक्शन समोर आलं आहे.

अमित शिंदे असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास कोथरूडमधील त्याच्या मोबाईल दुकानाबाहेर तो उभा असताना हा थरार घडला. हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला आणि अमितच्या डोक्यावर कोयत्याचे गंभीर वार केले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Pune Crime : अमित शिंदेवर जीवघेणा हल्ला, घायवळ कनेक्शन काय?

अमित शिंदे हा दुकानदार असला तरी त्याचं निलेश घायवळशी थेट कनेक्शन आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घायवळवर मकोका अंतर्गत जी कारवाई झाली होती त्यातील एका गुन्ह्यात अमित शिंदे हाच फिर्यादी आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे घायवळने अमितच्या दुकानातून एक सीमकार्ड घेतलं होतं, ज्याचा वापर तो गुन्हेगारी कृत्यांसाठी करत होता.

पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाल्यानंतर अमितच्या तक्रारीवरूनच घायवळवर गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यामुळे घायवळच्या मकोका कारवाईला मोठी मदत मिळाली होती. त्यामुळेच आता अमितवर झालेला हल्ला हा घायवळ गँगनेच घडवून आणला आहे का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या निलेश घायवळ हा देशाबाहेर पळून गेला असून सप्टेंबर महिन्यापासून तो परदेशातूनच आपली टोळी चालवत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दुसरीकडे कोथरूड पोलिसांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला निलेश घायवळने नव्हे तर अमितच्या नातेवाईकांनीच कौटुंबिक वादातून केला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पण हा वाद इतका टोकाला कसा गेला की थेट आठ ते दहा जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला करावा? याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या हल्ल्यातील हल्लेखोर अजूनही फरार आहेत. कोथरूड पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही