Share

पतीची हत्या, मृतदेहाचे ३ तुकडे अन् ११ महिने लपवाछपवी; पत्नीनेच रचला अंगावर काटा आणणारा कट

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. मृतदेहाचे ३ तुकडे करून जंगलात फेकले. ११ महिन्यांनंतर नवी मुंबईत गुन्ह्याचा पर्दाफाश.

Published On: 

Navi Mumbai Crime News - Police investigation in murder case at Gawalidev hill | murder case

मुंबई – एखादा भीषण गुन्हा करून किती काळ पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकली जाऊ शकते? महिना, दोन महिने, की वर्षभर? नवी मुंबईत एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच नवऱ्याचा काटा काढला. एवढंच नाही, तर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तीन तुकडे करून ते जंगलात फेकून दिले. धक्कादायक म्हणजे तब्बल ११ महिने तिने हा गुन्हा कोणालाही कळू दिला नाही.

ऐरोली परिसरात घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या हत्याकांडाचा (Murder Case) रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. अनैतिक संबंधांना विरोध करत असल्याने पत्नी सुनिता कुशवाह हिने तिचा रिक्षाचालक प्रियकर राहुल प्रजापती याच्या मदतीने पती बळीराम कुशवाह याची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनैतिक संबंधातून रंगला हत्येचा रक्तरंजित खेळ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जवळपास ११ महिन्यांपूर्वी म्हणजेच ९ ऑगस्टच्या रात्री घडली. सुनिता आणि राहुल यांच्या प्रेमसंबंधात बळीराम अडसर ठरत होता. त्यामुळेच या दोघांनी त्याचा कायमचा काटा काढायचं ठरलं. हत्येच्या रात्री सुनिताने अत्यंत हुशारीने मुलांना नातेवाईकांकडे पाठवून दिलं. बळीराम गाढ झोपेत असताना आरोपींनी आधी त्याचा गळा दाबला आणि नंतर धारदार शस्त्राने गळा चिरून त्याची निर्घृण हत्या केली.

हत्येनंतरचा घटनाक्रम आणखी भयानक आहे. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून आरोपींनी कटरच्या साहाय्याने बळीरामच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. हे तुकडे वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून राहुलच्याच रिक्षातून गवळीदेव डोंगरावरील जंगलात नेण्यात आले आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावली. या सगळ्या प्रकारानंतर सुनिताने आपलं जुनं घर भाड्याने दिलं आणि काहीच घडलं नाही या अविर्भावात ती मुलांसह घणसोलीत राहायला गेली.

जवळजवळ ११ महिने हा गुन्हा पचवण्यात सुनिता यशस्वी ठरली होती. पण बळीरामचा भाऊ जेव्हा तिच्याकडे भावाची चौकशी करायचा, तेव्हा ती सतत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. यामुळे भावाचा संशय बळावला आणि अखेर त्यानेच पोलीस ठाण्यात बळीराम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. इथूनच तपासाची चक्रे फिरली.

पकडले जाऊ नये म्हणून आरोपींनी अनेकदा आपली सिम कार्ड बदलली होती. पण पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला आणि सीडीआर (CDR) द्वारे पोलिसांना त्यांच्यातील संवादाचा सुगावा लागलाच. कडक चौकशीत दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या गवळीदेवच्या जंगलात पोलिसांची शोधमोहीम सुरू असून मृतदेहाचे काही अवशेष पोलिसांच्या हाती लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही