Share

विराट कोहली वनडे क्रिकेटचे किंग; ग्लेन मॅक्सवेलने केलं कौतुक

विराट कोहलीच्या वनडे कामगिरीचं ग्लेन मॅक्सवेलने कौतुक करत त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हटलं.

Published On: 

Glenn Maxwell on Virat Kohli

Cricket News : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या केवळ वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. टी-२० (T-20) आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, कोहली वनडे क्रिकेट खेळत आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) विराट कोहलीचे कौतुक केलं आहे. तसेच त्याला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. तसेच, मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने खेळलेल्या काही उत्कृष्ट खेळींचाही विशेष उल्लेख केला आहे.

Glenn Maxwell on Virat Kohli

‘कीपिंग इट क्रिकेट’ (Keeping It Cricket) या युट्यूब चॅनेलवर विराट कोहलीचे कौतुक करताना ग्लेन मॅक्सवेल म्हणाला, “वन-डे क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून मी कोहलीकडे पाहतो. आमच्याविरुद्ध त्याने खेळलेल्या काही खेळी अविश्वसनीय होत्या. त्याच्याकडे खूप वेळ असतो आणि तो मैदानावर हव्या त्या दिशेने चेंडू मारू शकतो. त्याचा लेव्हलच वेगळा आहे.”

विराट कोहलीमध्ये एकट्याच्या बळावर सामने जिंकण्याची क्षमता आहे आणि त्याने भारतीय संघासाठी स्वतःच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत, असाही ग्लेन मॅक्सवेल म्हणाला.

विराटचे आकडे देतात ग्वाही

ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की, “वनडे क्रिकेटमधील विराट कोहलीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्याच्या उत्कृष्टतेची कल्पना येते. जरी तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी नसला, तरी सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये ५० किंवा त्याहून अधिक शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे.”

विराट कोहलीची वनडे कारकीर्द

उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत ३१४ वनडे सामने खेळले असून, ३०२ डावांमध्ये १४,९४१ धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी ५८.५९ आहे, तर स्ट्राईक रेट जवळपास ९४ इतका आहे.

विराटने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ५४ शतके आणि ७९ अर्धशतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात इतर कोणत्याही फलंदाजाने इतकी शतके केलेली नाहीत. त्याची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या १८३ धावा आहे, ही खेळी त्याने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात श्रीलंकेविरुद्ध खेळली होती, असेदेखील ग्लेन मॅक्सवेलने बोलताना नमूद केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही