Share

मुजोर व्यवस्थेला जाग कधी येणार? विद्यार्थ्यांच्या आक्रोशावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

MPSC पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका करत संतप्त सवाल उपस्थित केला.

Published On: 

MPSC paper leak protest | Vijay Wadettiwar

अमरावती : MPSC परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून राज्यभरात वातावरण तापले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने एकत्र येऊन आवाज उठवला आहे.

परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जावी, अशी मागणी करत अमरावतीमधील हजारो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अमरावतीत विद्यार्थ्यांना या कथित गैरप्रकारांविरोधात रस्त्यावर उतरावं लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

MPSC paper leak protest | Vijay Wadettiwar

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही निर्लज्ज आणि निष्क्रीय सरकारसाठी शरमेची बाब आहे.” असे टीकास्त्र विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सोडले.

“वर्षानुवर्षे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या भविष्याशी खेळ मांडला जात असताना शासन डोळे मिटून गप्प का बसले आहे? प्रत्येक वेळी आक्रोश आणि आंदोलन केल्याशिवाय या मुजोर व्यवस्थेला जाग येणार नाही का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

MPSC अध्यक्ष आणि सचिवांना हटवण्याची मागणी

“लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिवांना तातडीने पदावरून हाकलून या संपूर्ण घोटाळ्याची आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

‘विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरू’

“विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारा भ्रष्ट कारभार आम्ही खपवून घेणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्ही पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अमरावतीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे MPSC परीक्षांमधील कथित प्रश्नपत्रिका फुटणे आणि अनियमितता यांसारखे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणावर सरकार आणि MPSC प्रशासन नेमकी काय भूमिका घेतात, याकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही