प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: MPSC विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) आजी आणि माजी अध्यक्षांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. या चौकशीबाबतची विनंती राज्य सरकारने राज्यपालांकडे केली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून त्याबाबत शासनाने निर्णय घेतले आहेत. मात्र, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण केले जात असून, राजकीय नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. तसेच, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले अभिनंदन केल्याची माहितीही त्यांनी दिली.
MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना हटवणे हे राज्य सरकारच्या हातात नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. संविधानानुसार सुप्रीम कोर्टाच्या शिफारसीवरूनच राष्ट्रपती त्यांना हटवू शकतात. पेपर फुटीच्या घटनेवेळी विद्यमान अध्यक्ष या पदावर नव्हते. मात्र, आता चौकशीत अध्यक्ष दोषी आढळल्यास कलम ३१७ प्रमाणे त्यांच्यावर कारवाईसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस केली जाईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
दिल्लीत सुरू असलेल्या राहुल गांधींच्या आंदोलनावरही मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले. भारतातील सर्व लोकशाही संस्था संपवण्याचा टोकाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या सर्व संस्था कुचकामी आहेत आणि संविधान न्याय देऊ शकत नाही, हे रुजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच, मुंबई पोलीस व्यावसायिक पद्धतीने काम करत असून ते कोणावरही चुकीची कारवाई करत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाली असून, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे ठरले आहे. २३ हजार गावांचा दुष्काळ संदर्भातील सर्व्हे पूर्ण झाला आहे. या परिस्थितीच्या पाहणीसाठी ११ तारखेला केंद्राकडून एक समिती येणार आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून लवकरात लवकर निधी मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी ‘इंडिया’ आघाडीचे दिल्लीत आंदोलन; पोलिसांकडून खासदारांना मारहाणीचा आरोप
- ज्यांनी घटनात्मक पाप केले… न्यायामूर्ती बागची यांचं मोठं विधान; शिंदे की ठाकरे? कुणाची अडचण?
- बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक
Quick Answers
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण केले जात असून, राजकीय नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी MPSC च्या आजी आणि माजी अध्यक्षांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, राज्य सरकारने याबाबत राज्यपालांकडे विनंती केली आहे.
MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही; संविधानानुसार सुप्रीम कोर्टाच्या शिफारसीवरून केवळ राष्ट्रपतीच त्यांना हटवू शकतात, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. चौकशीत दोषी आढळल्यास कलम ३१७ प्रमाणे राष्ट्रपतींकडे शिफारस केली जाईल.
राज्यातील २३ हजार गावांचा दुष्काळ संदर्भातील सर्व्हे पूर्ण झाला असून परिस्थितीच्या पाहणीसाठी ११ तारखेला केंद्राकडून एक समिती येणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









