Share

बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक

इंडिया आघाडीच्या ‘सेव्ह डेमॉक्रसी मार्च’मध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Published On: 

Rahul Gandhi protesting against Election Commission in Delhi

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर: इंडिया आघाडीच्या ‘सेव्ह डेमॉक्रसी मार्च’ दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाहीविरोधात गद्दारी केल्याचा आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.

एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात ३० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीने या मोर्चाची घोषणा केली होती. त्यानुसार, ६ ऑक्टोबर रोजी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे ३०० हून अधिक खासदारांचा मोर्चा निघाला. मात्र, दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंग करून ३०० हून अधिक खासदारांना रोखले आणि राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवले. तत्पूर्वी, आंदोलनाला रोखण्यासाठी लावलेल्या बॅरिकेड्सवर राहुल गांधी यांनी स्वतः चढून तिरंगा फडकावला.

ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी बसमधून उतरून गनिमी काव्याने थेट जवळच्या आकाशवाणी भवनाच्या परिसरात प्रवेश केला. राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत आकाशवाणी भवनातील एका झाडाखाली दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठिय्या आंदोलन केले. निवडणूक आयोगाचे कार्यालय अवघ्या २७० मीटर अंतरावर असताना निवडणूक आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना न भेटणे हा लोकशाहीचा अपमान असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मिळून देशातील लोकशाही संपवली आहे. देशाच्या निवडणुका मोदी आणि शाह यांनी हायजॅक केल्या असून ज्ञानेश कुमार यांनी त्यांना थेट मदत केली आहे,” असा दावा त्यांनी केला.

या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही आणि सर्वांवर देशद्रोहाची कारवाई होईल, असा इशारा राहुल गांधींनी दिला व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात ट्विट केले. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात गेल्या पाच दिवसांत दिल्ली आणि मुंबईत झालेले हे सातवे मोठे आंदोलन आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाहीविरोधात गद्दारी केल्याचा आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही