दिल्ली, 6 ऑक्टोबर: ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि खासदारांनी दिल्लीत तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप उपस्थित खासदार आणि नेत्यांनी केला आहे.
पोलिसांच्या या कथित मारहाणीत अनेक संसद सदस्यांना शारीरिक इजा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि धांगेकर यांचा समावेश आहे. पोलिसांनी महिला खासदारांना मारहाण केली असून, यामुळे आंदोलकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या झटापटीत वर्षा गायकवाड यांच्या करंगळीला रक्त लागल्याचेही सांगण्यात आले.
या आंदोलनादरम्यान निदर्शकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट बसवर चढून विरोध दर्शवला. यावेळी आंदोलकांनी “वोट चोर गद्दी छोड” अशा घोषणा दिल्या. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आपला हा संघर्ष सुरू असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगावर भाजप राजकारण करत असून आयोगाला बदनाम केले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. तसेच, काही मतदारसंघांमधून तब्बल चार लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. जोपर्यंत ज्ञानेशकुमार आपला राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ज्यांनी घटनात्मक पाप केले… न्यायामूर्ती बागची यांचं मोठं विधान; शिंदे की ठाकरे? कुणाची अडचण?
- बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक
- शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बागचींचे सहा महत्त्वाचे प्रश्न
Quick Answers
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि खासदारांनी ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत तीव्र आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप उपस्थित खासदार आणि नेत्यांनी केला आहे. या कथित मारहाणीत वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि धांगेकर या संसद सदस्यांसह इतरांना शारीरिक इजा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगावर भाजप राजकारण करत असून आयोगाला बदनाम केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच काही मतदारसंघांमधून तब्बल चार लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









