Share

आभाळाकडे डोळे लावलेल्या बळीराजासाठी खुशखबर; विश्रांतीनंतर राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्याच्या काही भागात पावसाने दमदार कमबॅक केलं असून, पावसामुळे सुकणाऱ्या पिकांना मोठं जीवदान मिळालं आहे.

Published On: 

Maharashtra Rain Update - Farmers feeling relieved as rain returns to parched farms.

मुंबई – आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची चिंता आता थोडी तरी कमी होणार का? गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलंय. पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर असलेल्या खरिपाच्या पिकांना यामुळे अक्षरशः नवसंजीवनी मिळाली आहे.

परभणी, बीड, रायगड ते थेट बदलापूरपर्यंत वरुणराजाने अचानक हजेरी लावली. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, त्यांचा जीव यामुळे भांड्यात पडला आहे. पण दुसरीकडे, अनेक भागात अजूनही पाऊस पडला नसल्याने तिथला शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

Maharashtra Rain Update : आठवडाभराच्या दडीनंतर पावसाची हजेरी

मराठवाड्यात बीड आणि परभणीत पावसाने चांगलीच बॅटिंग केली. केज शहरासह परिसरात सलग दोन तास कोसळलेल्या दमदार पावसामुळे रस्ते पूर्णपणे जलमय झाले होते. काही ठिकाणी तर गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अंबाजोगाई तालुक्यातही दुपारी दोनच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. कुंबेफळ, वरपगाव, राडी, सातेफळ आणि कानडी या परिसरातील पिकांना या पावसाने मोठं जीवदान दिलं आहे.

दुसरीकडे परभणीच्या जिंतूरमध्येही दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर आलेल्या या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली असली तरी, हा पाऊस शेतीच्या दृष्टीने अद्याप अपुरा असल्याचं चित्र आहे. बीड जिल्ह्यातील इतर अनेक तालुक्यांमध्येही अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही, त्यामुळे तिथला शेतकरी अजूनही दमदार पावसाची वाट पाहत आहे.

तिकडे कोकणातही पावसाने पुन्हा जोर धरला आहे. महापूर ओसरल्यानंतर रायगड जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे दांडी मारली होती. पण आता उत्तर आणि दक्षिण रायगडमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली असून कर्जत, खोपोली आणि खालापूर परिसरात जोरदार सरी कोसळल्या. बदलापूरमध्येही सकाळच्या रिमझिम पावसानंतर दुपारपासून स्टेशन परिसर, कात्रप, बेलवली आणि पनवेल मार्गावर पावसाचा जोर वाढला. अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये मात्र सध्या तरी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही