Share

‘…तर तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू!’ सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारवर भडकलं

सुनावणीला विलंब आणि जामिनाला विरोध करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कडक शब्दांत सुनावले असून, ‘तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू’ असा इशारा दिला आहे.

Published On: 

Supreme Court Slams Maharashtra Govt building of supreme court of india with judge gavel

दिल्ली – ८६ वेळा तारखा पडल्या, पण तब्बल ५३ वेळा आरोपीला कोर्टात हजरच केलं नाही. विचार करा, चार वर्षे तुरुंगात खितपत पडलेल्या एखाद्या व्यक्तीला न्याय कसा मिळणार? ही धक्कादायक माहिती समोर येताच खुद्द सर्वोच्च न्यायालयही संतापलं आहे.

‘फक्त जामिनाला कडाडून विरोध करायचा आणि दुसरीकडे खटले मात्र वेळेवर चालवायचे नाहीत, हे खपवून घेणार नाही. आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू,’ अशा अत्यंत कठोर शब्दांत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारची कानउघडणी केली आहे.

Supreme Court on Maharashtra Govt

न्यायव्यवस्थेच्या कारभारावर कोर्टाचा संताप

न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर एका परदेशी नागरिकाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. हा आरोपी अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्याखाली गेले चार वर्षे तुरुंगात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रदीर्घ काळात ३४ पैकी फक्त दोनच साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली आहे.

जलदगतीने न्याय मिळणे हा आरोपीचा मूलभूत अधिकार आहे, याची सक्त आठवण कोर्टाने करून दिली. खंडपीठाने स्पष्टच सांगितले की, “आम्हाला याची लाज वाटते. महाराष्ट्रातून रोज अशी प्रकरणे समोर येत आहेत. तुम्ही जामिनाला विरोध करता, पण जेव्हा आम्ही पुरावे तपासतो तेव्हा ते अत्यंत कमकुवत असल्याचे दिसते.”

दुसरीकडे, या फटकारण्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्येक सुनावणीच्या दिवशी सर्व आरोपींना ट्रायल कोर्टात हजर केले जात असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले. मात्र, न्यायालयाने सर्व राज्यांना जलद सुनावणीसाठी ठोस धोरण तयार करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. यापुढे दर आठवड्याला किमान चार साक्षीदारांची साक्ष नोंदवावी, असेही कोर्टाने बजावले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही