जालन्यात भरदिवसा थरार: बस अडवून तरुणीला खेचण्याचा प्रयत्न, जाब विचारणाऱ्या चालकाला बेदम मारहाण

जालन्यात एका माथेफिरू तरुणाने भरदिवसा खाजगी बस अडवून तरुणीला ओढण्याचा प्रयत्न केला आणि विरोध करणाऱ्या चालकाला बेदम मारहाण केली.

Published On: 

Jalna Crime News aggressive youth fighting with bus driver inside travel bus

जालना: भरदिवसा रस्त्यावरून जाणारी बस अचानक अडवली जाते आणि एक तरुण आत घुसून एका तरुणीला जबरदस्तीने खाली ओढण्याचा प्रयत्न करतो… हा एखाद्या चित्रपटातील सीन वाटतोय ना? पण जालन्यात हा संतापजनक प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.

जालना शहरातील औद्योगिक परिसरात एका माथेफिरूने खाजगी ट्रॅव्हल्सची बस अडवून मोठा धुडगूस घातला. या प्रकाराला विरोध करत जाब विचारणाऱ्या बस चालकालाही या तरुणाने अमानुषपणे मारहाण केली असून, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

Jalna Crime News: सीसीटीव्हीत कैद झाला भररस्त्यातील थरार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस औद्योगिक परिसरातून जात असताना अचानक एका तरुणाने ती रोखली. तो थेट आत घुसला आणि एका प्रवासी तरुणीला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागला.

दुसरीकडे, चालकाने प्रसंगावधान राखत या गुंडगिरीला विरोध केला आणि जाब विचारला. पण रागाच्या भरात या तरुणाने चालकाला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

हा सर्व प्रकार बसमधील सीसीटीव्हीत आणि खुद्द चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चालकाच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही