Share

व्हिएतनाममध्ये समुद्रात अचानक बोट उलटली; १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

व्हिएतनाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांची स्पीडबोट समुद्रात उलटून १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

Published On: 

Vietnam Boat Accident rescue operation in sea with border guards

Vietnam Boat Accident: परदेशात सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेलेल्या पर्यटकांवर अचानक काळाने घाला घातला आहे. व्हिएतनामच्या निळ्याशार समुद्रात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला असून, यात तब्बल १५ भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक भरधाव स्पीडबोट अचानक समुद्रात उलटली. या बोटीत एकूण ३६ प्रवासी होते, त्यापैकी २१ जणांना वाचवण्यात यश आलं असलं तरी १५ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Vietnam Boat Accident: समुद्राच्या रौद्र लाटा आणि ५ मिनिटांचा थरार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट ओशन पियर आयलंड कंपनीची होती. होन में रुटवरून एन थोई पोर्टकडे जात असताना हा भीषण प्रसंग ओढवला. विशेष म्हणजे त्यावेळी पाऊस नव्हता, पण समुद्रातील लाटा इतक्या प्रचंड आणि वेगवान होत्या की बोटीचा तोल गेला.

घटना घडली तिथे विमानतळ जेमतेम २५ किलोमीटरवर आहे. बोट उलटल्याचं पाहताच आजूबाजूच्या इतर बोटींवरील लोकांनी अवघ्या पाच मिनिटांत मदतीसाठी धाव घेतली. पण अनेक प्रवासी बोटीच्या आत अडकल्याने सुरुवातीला बचावकार्यात मोठे अडथळे आले.

घटनेची माहिती मिळताच एन थोई बॉर्डर गार्ड्सचे ३५ जवान आणि दोन जहाजे तातडीने घटनास्थळी पोहोचली. नौदल आणि कोस्ट गार्डने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत २१ जणांचे प्राण वाचवले. मात्र, २ महिला आणि १३ पुरुषांना वाचवण्यात अपयश आलं.

या घटनेनंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने तातडीने सूत्रे हलवली आहेत. बाधित कुटुंबीयांच्या मदतीसाठी हनोई आणि हो ची मिन्ह सिटीमध्ये २४ तास चालणारे विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मदतीसाठी +84 36 281 7930 आणि +84 91 308 9165 यांसारखे आपत्कालीन क्रमांक जारी करण्यात आले असून, दूतावास स्थानिक प्रशासनाच्या थेट संपर्कात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही