Share

‘वर्क फ्रॉम होम द्या, हा मानवतेचा धर्म आहे’; मुख्यमंत्री फडणवीसांचा खासगी कंपन्यांना इशारा

राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी कंपन्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले.

Published On: 

CM Devendra Fadnavis

🕒 1 min read

मुंबई: राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik), पालघर(Palghar), रायगड (Raigad) आणि रत्नागिरीसह (Ratnagiri) अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने नाशिकसाठी ढगफुटीचा इशारा दिला असून 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आढावा बैठकीनंतर दिली.

पत्रकार परिषदेत (Press Conference) खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) दिले जात नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक खासगी कार्यालय आणि आस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

मुख्यमंत्री म्हणाले, “कर्मचाऱ्यांच्या जीविताची जबाबदारी ही संबंधित आस्थापनांची आहे. हा केवळ कायद्याचा विषय नाही, तर मानवतेचा धर्म आहे. सरकारकडून हवामानाचा अलर्ट दिल्यानंतर सर्व संस्थांनी संवेदनशीलतेने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.”

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, अत्यावश्यक सेवा वगळता इतर अनेक सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत काही खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावत असतील, तर त्याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनाही पुन्हा एकदा आवाहन केले की, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांचे पालन करावे आणि प्रशासनाच्या सूचनांनुसार वागावे, असे ते म्हणाले. सध्याचे हवामान अलर्ट 8 जुलैपर्यंत लागू असल्याचेही त्यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही