Share

रायगडमध्ये पुराचा हाहाकार; एक-दोन नव्हे तब्बल ३००० गॅस सिलिंडर पाण्यात वाहून गेले, प्रशासनाची उडाली झोप!

रायगडमध्ये पाताळगंगा नदीच्या पुरात तब्बल ३००० गॅस सिलिंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Published On: 

3000 HPCL gas cylinders washed away in Patalganga river flood in Raigad.

🕒 1 min read

एखाद्या नदीला पूर आला की त्यात झाडं, जनावरं किंवा गाड्या वाहून गेल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण थेट हजारो गॅस सिलिंडरच (HPCL Gas Cylinder) पुराच्या पाण्यात वेगाने वाहून गेल्याचं कधी ऐकलंय का?

सध्या रायगड (Raigad Flood) जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला असून पाताळगंगा नदीला मोठा पूर आला आहे. याच पुराच्या पाण्यात एमआयडीसी आणि चावणे परिसरातील गोदामातून तब्बल ३ हजार गॅस सिलिंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Raigad Flood Updates

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहून गेलेल्या सिलिंडरमध्ये भरलेले आणि रिकामे अशा दोन्ही प्रकारच्या सिलिंडरचा समावेश आहे. पुराच्या पाण्याच्या वेगामुळे हे हजारो सिलिंडर आजूबाजूच्या अनेक भागांमध्ये आणि गावांमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना तातडीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणालाही हे सिलिंडर सापडल्यास त्यांनी ते स्वतः वापरण्याचा किंवा हाताळण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

नागरिकांनी सापडलेले सिलिंडर त्वरित HPCL प्रशासनाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही