Share

रुपाली चाकणकरांच्या २५ कोटींच्या दाव्यावर दीपाली सय्यद यांचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, ‘सिनेमा तर…’

भोंदूबाबावरील सिनेमावरून रुपाली चाकणकर यांनी २५ कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोर्टात सडेतोड उत्तर देत मोठं आव्हान दिलं आहे.

Published On: 

Deepali Sayed reacts to Rupali Chakankar 25 crore defamation notice over Ashok Kharat movie.

एखाद्या वादग्रस्त भोंदूबाबावर सिनेमा येतोय म्हटल्यावर साहजिकच चर्चांना उधाण येणार. पण त्यात जर एखाद्या बड्या महिला नेत्याचं नाव जोडलं गेलं, तर राजकारण तापणार नाही असं कसं होईल? नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून आता थेट २५ कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकण्यात आलाय आणि याला अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काही दिवसांपूर्वी याच भोंदूबाबासोबत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.

Rupali Chakankar Defamation Notice

याच सिनेमात चाकणकर यांची भूमिका दीपाली सय्यद साकारत आहेत. याची कुणकुण लागताच चाकणकरांनी दीपाली यांच्यासह तब्बल ४० जणांना मानहानीची नोटीस बजावली आहे. या २५ कोटींच्या दाव्यावर दीपाली सय्यद यांनी कोर्टात थेट उत्तर दाखल करत चाकणकरांना आव्हान दिलंय.

“मी त्यांच्या नावाचा वापर करून त्यांची बदनामी करत असल्याचा त्यांचा गैरसमज आहे. सिनेमात जे सत्य आहे तेच दाखवलंय, जे नाही ते मी कधीही बोलले नाही. आम्ही कुणाचीही बदनामी करत नाही,” असं दीपाली यांनी स्पष्ट केलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणकरांनी फक्त दीपाली यांनाच नाही, तर सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे यांच्यासह अनेक चॅनेल्सनाही नोटीस पाठवली आहे. पण या नोटिशीमुळे सिनेमाचं काम अजिबात थांबणार नसल्याचं दीपाली सय्यद यांनी ठणकावून सांगितलंय.

सध्या या सिनेमाचं ७० टक्के शूटिंग पूर्ण झालं असून येत्या २ ऑक्टोबरला तो रिलीज होणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. “मी जर अशा पदावर असते, तर त्या भोंदूबाबाला थेट फाशीचीच शिक्षा दिली असती,” असा सणसणीत टोलाही दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. त्यामुळे आता या कायदेशीर लढाईत पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही