हातात बाळ, अंगात ‘तो’ टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केला फोटो, टी-शर्टवरील शब्दांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ!

सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोतील टी-शर्टवरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘कॅप्टन’ खोडलेला आणि ‘लीडर’ लिहिलेला हा टी-शर्ट लक्ष वेधतोय.

Published On: 

Suryakumar Yadav wearing a t-shirt with Captain crossed out and Leader written below, holding a baby.

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे. पण अचानक त्याच्या एका फोटोमुळे क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर, सूर्याने संघ व्यवस्थापनाला थेट आव्हान तर दिलं नाही ना, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

झालं असं की, सूर्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) हिने इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर केला. यात सूर्या एका लहान बाळासोबत निवांत वेळ घालवताना दिसतोय. पण सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या त्याच्या अंगातल्या काळ्या टी-शर्टवर.

Suryakumar Yadav News

या टी-शर्टवर इंग्रजीत ‘कॅप्टन’ आणि ‘लीडर’ असे दोन शब्द छापले आहेत. विशेष म्हणजे ‘कॅप्टन’ शब्दावर आडवी रेष मारून तो खोडून काढलाय आणि त्याखालील ‘लीडर’ हा शब्द ठळकपणे दिसतोय. हा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. एकेकाळी भारताचा टी-20 कर्णधार असलेला सूर्यकुमार सध्या संघातून पूर्णपणे बाहेर आहे.

निवड समितीने त्याला अचानक डावलल्याने अनेक चाहत्यांना आधीच मोठा धक्का बसला होता. अशातच हा टी-शर्ट समोर आल्याने, ‘कर्णधारपद हिरावून घेतलं तरी माझ्यातला लीडर कायम आहे’, असा अप्रत्यक्ष टोला तर त्याने लगावला नाही ना? अशी शंका चाहते व्यक्त करत आहेत.

सध्याच्या संघ निवडीच्या पार्श्वभूमीवर या पोस्टची टायमिंग खूपच सूचक मानली जात आहे. काहींच्या मते हा फक्त एक कॅज्युअल टी-शर्ट असू शकतो आणि त्याचा कोणताही वेगळा अर्थ काढू नये. पण सध्या सूर्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरवरच प्रश्नचिन्ह उभं राहिल्याने, या एका फोटोने आगीत तेल ओतण्याचं काम नक्कीच केलंय.

दुसरीकडे, या सर्व चर्चा केवळ सोशल मीडियापुरत्या मर्यादित आहेत. या संपूर्ण प्रकरणावर सूर्यकुमार यादव किंवा देविशा शेट्टी यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तरीही, टी-20 मधील या यशस्वी फलंदाजाच्या संघात परतण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही