कर्नाटक हादरलं! 7 हजारांहून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह; सर्व कॉलेजांना तातडीचे तपासणी आदेश

कर्नाटकात 7 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये HIV Positive आढळल्याच्या अहवालानंतर सरकारने सर्व महाविद्यालयांमध्ये नियमित तपासणी शिबिरे अनिवार्य केली आहेत.

Published On: 

HIV

कर्नाटक : शेजारच्या कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. राज्यात केवळ एक-दोन नव्हे, तर तब्बल ७,००० विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सची (HIV/AIDS) (HIV Positive) लागण झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील एका अहवालामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

अहवालानुसार, राज्यातील १८ ते २५ वयोगटातील ७,००० हून अधिक विद्यार्थ्यांना HIVची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत, कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये नियमित HIV चाचणी आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

‘नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (NACO) अहवालानुसार, HIV-बाधित व्यक्तींच्या संख्येच्या बाबतीत कर्नाटक देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या राज्यात सुमारे २,६०,००० लोक एचआयव्हीसह जगत आहेत आणि त्यापैकी २,०५,००० जण उपचार घेत आहेत. मात्र, जवळपास ५४,००० लोकांना आपल्या संसर्गाबद्दल अद्याप माहिती नाही, ही बाब आरोग्य विभागासाठी चिंतेची मोठी बाब ठरली आहे.

आकडेवारीवरून असे दिसून येते की, १८ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये या संसर्गाचा वेगाने प्रसार होत आहे. या वयोगटातील बाधित व्यक्तींची संख्या २०२३-२४ मध्ये ४४,५०० होती, जी २०२५-२६ च्या कालावधीत वाढून ६६,६०० वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर, कर्नाटकातील विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने (VTU) आपल्याशी संलग्न असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

ही मोहीम ‘मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा’ (Mobilization for AIDS Suraksha) कार्यक्रमांतर्गत राबविली जाईल. याचा उद्देश केवळ HIVबद्दलच नव्हे, तर हिपॅटायटीस-बी आणि सिफिलिससारख्या आजारांबद्दलही जागरूकता निर्माण करणे हा आहे. जिल्हा एड्स नियंत्रण अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित केली जाणारी ही शिबिरे जुलै २०२६ पासून सुरू होऊन आठ महिन्यांच्या कालावधीत विविध टप्प्यांत घेतली जातील.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही