Share

Coal Scam प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; मनमोहन सिंग यांना अखेर मोठा दिलासा

कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने CBI चा क्लोजर रिपोर्ट स्वीकारत ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द केला आणि दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सर्व आरोपांतून पूर्णपणे दोषमुक्त ठरवले.

Published On: 

Manmohan Singh

नवी दिल्ली : कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. संयुक्त पुरगामी आघाडी (UPA) सरकारच्या कार्यकाळात या मुद्द्यावरून भाजप आणि विरोधी पक्षांनी तीव्र आरोप केले होते. या महत्त्वपूर्ण निकालामुळे दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना दिलासा मिळाला असून, सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधानांबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ (Closure Report) अखेर स्वीकारला आहे.

न्यायालयाचे कठोर निरीक्षण…

सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट फेटाळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे कोणतेही ठोस आधार नव्हते, हे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा पूर्वीचा आदेश रद्द केला. “सीबीआयचा अहवाल फेटाळून प्रकरणाची दखल घेण्याचे कोणतेही वैध कारण ट्रायल कोर्टाकडे नव्हते. त्यामुळे, आम्ही CBI चा क्लोजर रिपोर्ट स्वीकारतो आणि प्रकरणाचे गुणदोष तपासून ते बंद करतो,” असे खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले.

निधनानंतर दीड वर्षांनी मिळाला न्याय

डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे २६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तब्बल दीड वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि हे प्रकरण पूर्णपणे बंद केले.

न्यायालयात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात डॉ. मनमोहन सिंग यांचे प्रतिनिधित्व केले. सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विनंती केली की, “माजी पंतप्रधानांविरुद्ध करण्यात आलेली आक्षेपार्ह विधाने आणि टिप्पण्या पूर्णपणे काढून टाकल्या जाव्यात. त्यांच्या नावावर असा कोणताही डाग राहू नये.”

१ एप्रिल २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाने डॉ. मनमोहन सिंग यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती दिली होती. सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता की, जरी हिंदाल्कोला कोळसा खाण वाटप करण्याचा निर्णय ‘स्क्रीनिंग कमिटी’च्या शिफारशींच्या विरोधात गेला असला, तरी तो केवळ एक प्रशासकीय निर्णय होता आणि त्यात कोणतीही बेकायदेशीर बाब नव्हती. सीबीआयने दोनदा क्लोजर रिपोर्ट सादर करूनही ट्रायल कोर्टाने समन्स बजावले होते. आज, कोळसा घोटाळ्याशी संबंधित आरोपांमधून मनमोहन सिंग यांना पूर्णपणे दोषमुक्त करून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा अखेर निकाल लावला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही